29 August Rashifal : मिथुन आणि तुळसह या ३ राशीच्या जातकांना मिळेल खुशखबर, वाचा दैनिक भविष्य

नवी दिल्ली : Today Horoscope | ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचे भविष्य सांगतात. दैनिक राशिफळ (Dainik Rashifal) हे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित एक जन्मकुंडली आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) दैनंदिन अंदाज स्पष्ट केले जातात. ही कुंडली काढताना ग्रह नक्षत्रांसह पंचांगाच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभर घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे भाकीत करते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. उदाहरणार्थ, ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली सांगते की आजचे तुमचे ग्रह-तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही. आज आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हे समजू शकते. दैनंदिन कुंडली वाचून, तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी (संधी आणि आव्हाने) तयार राहू शकता.

मेष (Aries Daily Horoscope)
आज व्यवहारात सावधगिरी बाळगा. कायदेशीर प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन केल्याने पुढे जाल. चांगल्या विचारसरणीने लोकांवर सहज मात कराल. शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, समस्या येऊ शकते. मन अभ्यासावरून भरकटू शकते. यामुळे परीक्षेवर परिणाम होऊ शकतो, अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनातील अडथळा दूर होईल. प्रियजनांचे सहकार्य मिळेल. घरी शुभकार्य आयोजित केल्याने वातावरण प्रसन्न राहील. कुटुंबातील लोकांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, अन्यथा त्यांना वाईट वाटू शकते. प्रगतीच्या मार्गात येत असलेले अडथळे दूर होतील.

मिथुन (Gemini Daily Horoscope)
आजचा दिवस परिश्रम आणि समर्पणाने काम करण्याचा आहे. डेली रूटीन सांभाळा. जवळच्या लोकांवर विश्वास ठेवा. मेहनतीला फळ येईल. व्यवसाय सुरू होईल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद वाढू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत चांगली कामगिरी कराल आणि लोकांना आश्चर्यचकित कराल.

कर्क (Cancer Daily Horoscope)
दिवस उत्साही आहे. सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. संततीला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल. कुटुंबातील लोकांना काही वाईट वाटू शकते. विद्याथ्र्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा अडचण येऊ शकते. कुटुंबातील लहान मुलांसाठी भेटवस्तू आणाल.

सिंह (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. कामांची यादी तयार करून पुढे गेलात तर ती वेळेत पूर्ण होतील. घाईत घेतलेला निर्णय अडचणी निर्माण करू शकतो. उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कौटुंबिक बाबींवर लक्ष असेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा बेत कराल. संततीला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल, अन्यथा ते रागावतील.

कन्या (Virgo Daily Horoscope)
आज महत्वाच्या कामात गती ठेवा. सामाजिक क्षेत्रात व्याप्ती आणखी वाढेल. जवळच्या लोकांच्या समस्या ऐकण्यात दिवसातील बराच वेळ घालवाल. कुटुंबातील लोकांना तुमची एखादी गोष्ट वाईट वाटू शकते. व्यवहाराचे एखादे प्रकरण डोकेदुखी बनू शकते, त्यामुळे कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा.

तूळ (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस आनंदाचा आहे. कुटुंबातील सदस्यांमुळे खर्च वाढल्याने अस्वस्थ राहाल. महत्त्वाच्या गोष्टींबद्दल वाटत असलेली काळजी दूर होईल. आत्मविश्वासाने पुढे गेल्यास कोणतीही अडचण येणार नाही. व्यवसायात येत असलेली अडचणी दूर होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवणार आहे. सर्जनशील कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वैयक्तिक जीवनातील समस्यांपासून काहीसा आराम मिळेल. अनोळखी व्यक्तीने दिलेला सल्ला पाळणे टाळा. नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सासरच्या मंडळींकडून आदर होताना दिसत आहे.

धनु (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसायाच्या योजनांना चालना मिळेल. सरकारी योजनेत पैसे गुंतवण्याआधी संपूर्ण माहिती घ्या.
कुटुंबातील सदस्याच्या वागणुकीबद्दल वाटत असलेली काळजी दूर होईल.
कुटुंबातील एखादा सदस्य नोकरीसाठी घरापासून दूर जाऊ शकतो. एखाद्या मित्राच्या तब्येतीची काळजी वाटेल.

मकर (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करावे लागेल.
प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे प्रयत्न यशस्वी होतील. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. बाहेर फिरताना महत्वाची माहिती मिळेल.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. लांबच्या प्रवासाला जाऊ शकता.
कायदेशीर प्रकरणात विजय होईल. कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळा, अन्यथा अडचण येऊ शकते.
शिक्षणात बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून सुटका होईल. कामासाठी दूरच्या प्रवासाची योजना आखू शकता.

मीन (Pisces Daily Horoscope)
आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. कामात येत असलेले अडथळे दूर होतील. भावंडांशी चांगले जमेल.
दीर्घकालीन योजनांचा चांगला लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात पात्रतेनुसार काम मिळाल्याने  आनंदी व्हाल.
काही विरोधक कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, पण चतुर बुद्धिमत्तेने त्यांच्यावर मात कराल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Blood Sugar वाढल्याने किडनी फेल होण्याचा धोका! स्वत:ची ‘या’ ५ प्रकारे घ्या काळजी