Government Job : पश्चिम मध्ये रेल्वेत बंपर भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. पश्चिम मध्य रेल्वेकडून 10 वी पास उमेदवारांसाठी अपरेंटिस पदासांठी भरती प्रक्रिया सुरु आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ही सुवर्णसंधी आहे. नोटीफिकेशननुसार अपेरेंटिससाठी एकूण 716 रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. अर्ज करण्यासाठी आज 30 एप्रिल 2021 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in किंवा mponline.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करु शकतात.

कोणत्या पदांची भरती होणार ?

रेल्वेच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार फिटर, वेल्डर, वायरमन, कॉम्प्यूटर ऑपरेटर, मशिनरी, सर्वेयर, स्टेनोग्राफर, मॅकेनिक, पेंटर, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन या पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयची डिग्री असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादेत तीन वर्षे आणि एससी-एसटी प्रवर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अशी होईल निवड

उमेदवारांची निवड प्रक्रिया 10 वी आणि आयटीआय आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार केली जाईल. उमेदवार या व्हॅकेन्सीबाबतची अधिक माहिती अधिकृत नोटिफिकेशनद्वारे घेऊ शकतात.