आज रविवार ! मटण खाल्ल्यानंतर ‘हे’ खाणे कटाक्षाने टाळाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रविवार म्हटलं की, लगेच अनेकांच्या डोळ्यापुढे येतं ते म्हणजे मटण आणि चिकन. कारण रविवार म्हणजे चिकन-मटण खाण्याचा हक्काचा दिवस असतो. या दिवशी मटणावर ताव मारण्यापासून स्वत:ला रोखणे अनेकांना शक्य नसते. सध्या आषाढ महिना सुरु आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मटण खाणे टाळतात. त्यामुळे आषाढात अनेक लोक चिकन-मटणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात. तुम्हीही जर मटण खात असाल तर हमखास खा. परंतु मटण खाल्ल्यानंतर मात्र काही गोष्टींचे सेवन आवर्जून टाळायला हवे. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

१) सिगारेट – तुम्ही मटण खाल्ल्यानंतर धुम्रपान केलं काय आणि खाण्याआधी केलं काय धुम्रपान तर तसंही आरोग्याला घातकच आहे. त्यामुळे धुम्रपान करणे टाळायला हवे. जेवणानंतर लगेच धु्म्रपान केल्याने आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात.

२) चहा – चहाचे सेवन केल्याने गॅस आणि अ‍ॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर चहाचे सेवन टाळणे गरजेचे आहे.

३) लगेच झोपणे – मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच झोपत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही अनेक रोगांना आमंत्रण देत आहात. मटणात तिखटाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पित्त आणि जळजळ यांसारख्या समस्या लगेच उद्भवतात.

४) मध – मधामध्ये जे घटक असतात त्याचा परिणाम थेट हृदय किंवा किडनीवर होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन टाळणे गरजेचे आहे.

५) दूध – दूध किंवा दुधाचे पदार्थ मटण खाल्ल्यानंतर अजिबात खायला नकोत. कारण तुम्हाला माहिती नसेल परंतु दुधात अ‍ॅंटीबायोटिक पदार्थ असतात. यामुळे याचा शरीरावर थेट परिणाम होऊन कोड फुटण्यासारखे रोग होऊ शकतात. दुधाला उत्तम पर्याय कोणता असेल तर तो दही आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like