पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आज मोठे ‘फेर बदल’ होण्याची शक्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन दिड महिना होत आला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणाहून मिळणारे मनुष्यबळ मिळालेले आहे. काही अधिकारी मिळणे बाकी आहेत. आयुक्तांनी महिनाभर सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे कामकाज पाहिले आहे तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्यास प्रथम प्राधान्य दिले आहे. आज संपूर्ण पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c7d73401-c70a-11e8-b03d-91a8d9688368′]

पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण यांच्यातील पोलीस ठाणे कमी करुन तयार करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत असल्याने गणेशोत्सव सुरु होण्याच्या आदली रात्री पुणे पोलीस आयुक्तालयातून सहायक फौजदार ते पोलीस शिपाई अशा एकूण १६६९ जणांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले. तर त्यापूर्वी एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक आणि ६७ पोलीस उपनिरीक्षक देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण पोलिसांकडून पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग करण्यात आलेले आहेत.

तसेच राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अप्पर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून ते सर्वजण हजर झाले आहेत. मात्र अद्याप सहायक पोलिस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांची आयुक्तालयास गरज असून अधिकारी त्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच पुणे शहर पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी देणे बाकी आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdc685d7-c70a-11e8-8ff8-975ec7e491d2′]

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची विभाजनी झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून १८५५ आणि पुणे ग्रामीणकडून ३५२ जणांचे मनुष्यबळ देण्याचे ठरले होते. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी दोन्ही कडून काही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र पुणे शहर पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना अधांतरी ठेवण्यात आले होते. आज पुणे शहर पोलीस यांच्याकडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी १६६९ जणांची बदली केली आहे. झोन तीनमधील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि इतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये सहायक फौजदार १४३, पोलीस हवालदार ३७५, पोलीस नाईक ४२०, पोलीस शिपाई ७३१ असे एकूण १६६९ पोलिस कर्मचारी दिले आहेत. तर पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) मधील पोलीस ठाण्यातील ५७ पोलीस हवलदार ते पोलीस शिपाई यांना पोलीस आयुक्तालयात घेण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d37487c4-c70a-11e8-a93b-c7b79130dcff’]

आयुक्तालय सुरु होऊन दिड महिना झाल्याने वरिष्ठांना हद्दीची आणि कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची कार्यक्षमता माहीत झाली आहे. त्यातच गणेशोत्सव पार पडलेला आहे. त्यामुळे आता आयुक्ताल्याची फेररचना करण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण पोलिसांकडून आलेल्या पोलीस ठाण्यात दोन निरीक्षकांची नियुक्ती, वाहतूक विभाग तसेच गुन्हे शाखेची वेगवेगळे विभाग तयार करण्यात येणार आहेत. तसेच बाहेरून आलेल्या सक्षम अधिकाऱ्यांना योग्य ठिकाणी नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू होते. आस्थापना मंडळाने नियुक्त्या फायनल केल्या असून आज फेरबदल होण्याची शक्यता आहे.

जाहीरात