आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीने सावध राहून करा ‘गुंतवणूक’, अन्यथा ‘नुकसान’ होण्याची शक्यता

मेष रास –
आर्थिक परिस्थिती आज चांगली असेल. मेहनत कमी येईल. प्रेम संबंधात आज वाद होण्याची शक्यता आहे. आजारापासून सुटका होईल.

वृषभ रास –
शिक्षण असून देखील नोकरी मिळण्यात अडचणी येतील. पैशांचे व्यवहार करताना सावधान रहा. पदोन्नतीचा योग आहे. व्यवसायात गुंतणूक लाभकारक ठरेल.

मिथुन रास –
आजचा दिवस अनुकूल असेल. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची मात्र काळजी घ्या. कुटूंबात विवाह कार्य पार पडण्याची शक्यता आहे.

कर्क रास –
आजचा दिवस साधारण असेल. कामाच्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी, वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. घरगुती कामात समस्या येतील.

सिंह रास –
व्यवसायात परिस्थिती उत्तम असणार आहे, लाभ मिळण्याची शक्यता आहे. अत्याधिक खर्चापासून सावध रहा. हिरवा रंग शुभ ठरेल. दुपारची वेळ अनुकूल असेल.

कन्या रास –
बोलताना सावधपूर्वक बोला, नुकसान सोसावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मुलाखतीसाठी जाणार असाल तर नक्की यश मिळेल.

तुळ रास –
तुमच्या कामात आणि कुटूंबाकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. नवी नोकरी मिळेल. संतान प्रप्तीचा योग आहे.

वृश्चिक रास –
कुटूंबात वावरताना काळजी घ्या, पत्नीशी वाद घालू नका. कुटूंबात नाराजीचे वातावरण येण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडून समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

मकर रास –
आजचा दिवस लाभदायक असेल. व्यवसायात लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. वाद घालू नका. मुलांची काळजी घ्या.

कुंभ रास –
धार्मिक यात्रा करण्याचा विचार कराल. आई वडिलांची काळजी घ्या. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. घरात मंगलकार्याचा योग आहे.

धनू रास –
वाईट कामापासून लांब रहा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दुसरी नोकरी मिळण्याचा योग आहे. नम्र राहून व्यवहार करा.

मीन रास –
दूर प्रवासाचा योग आहे. राजकीय क्षेत्रात असल्यास चांगले पद मिळेल. शेअर बाजारात सावधपूर्वक गुंतवणूक करा. धन प्रप्ती होईल परंतू घाई करु नका.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]