तौसिफ शेख मृत्यूप्रकरण : निफाड तहसिलवर धडकला मूकमोर्चा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – तौसिफ शेख यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ निफाड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. दुपारी जामा मस्जिद येथे निफाड शहरातील मुस्लीम बांधव जमा झाले. त्यानंतर येथून मुस्लीम समाज व जामा मस्जिद पंच कमिटीतर्फे निफाड शहरातून शनी महाराज चौक, मेनरोडमार्गे मूक मोर्चा काढून निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड उपस्थित होते.

कर्जत (जि. अहमदनगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तौसिफ शेख यांनी तेथील वक्फ जमिनीवरील सर्व अतिक्रमण दूर करण्यासाठी वारंवार केलेल्या मागणीबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने नैराश्यापोटी आत्मदहन केले. या घटनेला जिल्हा प्रशासनच कारणीभूत आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, तसेच शेख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी व आर्थिक मदत मिळावी व अतिक्रमण दूर करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर दिलावर तांबोळी, इरफान सय्यद, जावेद शेख, आसिफ पठाण, तौसिफ मन्सुरी, रफिक शेख, तन्वीर राजे, मजिद शेख, वकील शेख, नूर शेख, शकील पठाण, आरिफ मणियार, युसूफ शेख, शब्बीरखाँ पठाण, तय्यब शेख, तौसिफ राजे, दबीर पटेल, अमजद शेख, हाजीमलंग फकीर, हाजी शौकतखाँ पठाण, लाला पठाण, हसन शेख, आरिफ अन्सारी, रियाज पठाण, सलीम शेख, वसीम शेख, राजू देशमुख, मुस्तफा तांबोळी, मन्सूर पटेल, अश्पाक पठाण, वसीम तांबोळी, अमजद शेख, इसाक तांबोळी, शाहरुख मन्सुरी, करीमखाँ पठाण, अश्रफ पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.