Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं टुरिस्ट टॅक्सी 31 मार्चपर्यंत राहणार बंद

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रसार वाढत आहे. सरकाराने लोकांना आवश्यकता नसल्यास घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशनने 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली, यामुळे शहरातील जवळपास 1,500 गाड्या बंद होणार आहेत.

औरंगाबाद ट्रॅव्हल्स टॅक्सी असोसिएशन सदस्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत कोरोनापासून खबरदारी म्हणून उपाययोजना राबवल्या आहेत.

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण ढेेरे यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आमेर हुसैनी, सचिव अनिल कऱ्हाळे यांंच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.