भूमकर चौकात वाहतूक पोलिसाला धक्काबुकी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

चौकातील ‘झेब्रा क्रॉस’वर उभा असलेली कार पाठीमागे घ्यायला सांगितली म्हणून चालकाने वाहतूक पोलिसाला अपशब्द वापरून धक्काबुकी केली. हा प्रकार भूमकर चौकात गुरुवारी सकाळी आकराच्या सुमारास घडला.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f98f6df2-8b6e-11e8-b500-0d291a8add77′]

याप्रकरणी पोलिस हवालदार जयराम सावळकर यांनी फिर्याद दिली आहे तर राजेश वसंत मोगल (३४, रा. पौड रोड, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावळकर हे भूमकर चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी राजेश हा त्या ठिकाणी त्याची कार घेऊन आला. त्याची कार झेब्रा क्रॉसिंगवर असल्याने सावळकर यांनी कार मागे घेण्यास सांगितले. यावरून चिडून राजेश याने अपशब्द वापरले. तसेच अंगावर धावून, धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

हिंजवडी आणि वाकड परिसरात वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसांना अनेकदा असे वाईट अनुभव येत आहेत. वाहतूक पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना धक्काबुकी, मारहाण, शिवीगाळ असे प्रकार वारंवार होत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like