आता लवकरच विमानातूनही उभं राहून प्रवास करता येणार ; जाणून घ्या काय आहे प्रकार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकवेळा गर्दीमुळे आपल्याला लोकल ट्रेन, एसटी किंवा अन्य प्रवासी वाहनांमधून उभे राहून प्रवास करावा लागतो. मुंबईमधील लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या लोकांना तर हा अनुभव नित्याचाच असतो. परंतु विमानात देखील उभे राहून प्रवास करण्याचा विचार कधी केला आहे का ? आता लवकरच ही कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. होय आता विमानातूनदेखील उभ्याने प्रवास करता येणार आहे. मागील वर्षी जर्मनीमधील हॅमबर्ग येथे झालेल्या एअरक्राफ्ट इंटीरीयर एक्सपो या कार्यक्रमामध्ये एका कंपनीने स्कायरायडर 2.0 नावाच्या विमानातील या खास सीट्स सादर केल्या होत्या. एव्हींटीरीयर्स असे या कंपनीचे नाव असून यांनी सादर केले अत्याधुनिक सीट्स ‘स्टॅण्डींग सिट्स’ ज्याच्या सहाय्याने आता विमानातून उभे राहून देखील प्रवास करता येईल.

नुकतेच या सीट्स चे अपडेटेड व्हर्जन म्हणजे स्कायरायडर 3.0 देखील या कंपनीने सादर केले आहे. यानंतर लवकरच विमानाच्या ‘अल्ट्रा-बेसिक इकनॉमी’ या क्लासमध्ये या सीट्स वापरून उभे राहून प्रवास करता येन्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या उभ्या सीट्सची संकल्पना केवळ यावेळी पहिल्यांदाच मांडण्यात आलेली नाही तर मागील दशकभरापासून याची चर्चा सुरु आहे. मात्र यासंदर्भात प्रवाशांच्या प्रतिक्रिया काहीशा नकारात्मक आहेत त्यामुळे अजून कोणत्या कंपनीने हि सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

स्कायरायडर 3.0 वर बसणे घोड्यावर बसून भटकंती करण्यासारखे :
कमी जागेत अधिक लोकांना सामावून घेता येणार असल्याने अशा उभ्या सीट्स चा सर्वाधिक फायदा विमान कंपन्यांना होणार आहे. “आम्हाला प्रवाशांना पर्याय उपलब्ध करुन द्यायचे आहेत म्हणून हा पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत याचा अर्थ असा घेऊ नये की आम्हाला विमानांमध्ये हजारो लोकांना भरायचे आहे” असे स्पष्टीकरण ‘एव्हींटीरीयर्स’ कंपनीच्या जीओटाने पेरुग्नी यांनी यासंदर्भात दिले. या सीट्स च्या सुविधेमुळे विमानामध्ये एकाच केबीनमध्ये प्रिमियम इकनॉमी, स्टॅण्डर्ड इकनॉमी आणि अल्ट्रा बेसिक इकनॉमी असे पर्याय उपलब्ध होतील. कंपनीने म्हटल्यानुसार स्कायरायडर 3.0 वर बसण्याचा अनुभव घोड्यावर बसून अनेक तास भटकंती करण्याच्या अनुभवासारखा असेल. कारण या सीटवर बसणे म्हणजे गुडघ्यात थोडेसे वाकून उभं राहण्यासारखंच आहे. त्यामुळेच प्रवाशांना याची कल्पना आवडलेली दिसत नाही आणि यासंदर्भात ट्विटरवरील प्रतिक्रिया काहीशा नकारात्मक आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा