Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसने घेतला पेट; 29 प्रवासी सुखरूप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत लातूरवरून पुुुुण्याला येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने पेट घेतला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान घडली. बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांच्यासह अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लातुर जिल्हातील मुखेडहुन पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती. यात अकरा महि्लांसह २९ प्रवाशी प्रवास करत होते. ही बस आज सकाळी उरुळी कांचन जवळ बंद पडली. यावेळी बस चालकाच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालु झाली. त्यानंतर ही बस लोणी काळभोरहुन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ येताच, बसचा उजव्या बाजुचा मागील टायर फुटला. टायर फुटताच टायरने प्रथम पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षातच, बस चालकाने बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन, बस मधील प्रवाशांना खाली उतरवले. हि सर्व धावपळ सुरु असतानाच बसनेही मागील बाजुकडुन अचानक पेट घेतला.

सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. आगीत प्रवाशांचे खाण्यापिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाली. दरम्यान आगीची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांच्यासह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबतची नोंद लोणीकाळभोर पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.