Trigeminal Neuralgia | चेहऱ्याच्या ‘या’ जीवघेण्या दुर्मिळ आजारापासून 65 वर्षीय महिलेची मुक्तता ! आधुनिक वेदना मुक्त उपचाराने मिळाले महिलेला जीवन दान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Trigeminal Neuralgia | चेहऱ्याच्या काही भागात होणाऱ्या असह्य वेदनेमुळे ब्रश न करू शकणाऱ्या किंवा साधी चूळही न भरू शकणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशनसारख्या (Radiofrequency Ablation) अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे नवे जीवदान मिळाले आहे. नेहमीच्या तीव्र वेदनांमुळे ‘सुसायडल डिसीज’ (Suicidal Disease) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ (Trigeminal Neuralgia) ह्या आजाराने त्या ग्रस्त होत्या. त्यांनी घेतलेल्या न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) आणि डेंटिस्ट च्या उपचारा नंतरही त्यांना आराम मिळाला नाही. पण ‘पेनेक्स’मध्ये (Painex) केलेल्या रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशननंतर त्यांना त्वरित आराम मिळाला आणि अवघ्या दोन आठवड्यांतच त्या आपले जुने औषधोपचार बंद करू शकल्या.

ह्या उपचाराला आता अनेक महिने उलटून गेले असून, त्या सध्या एक सामान्य आणि वेदनारहित जीवन जगत आहेत.ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा एक न्यूरोलॉजिकल (Neurological ) विकार आहे. ब्रश करताना किंवा चूळ भरताना चेहऱ्याच्या काही भागात होणाऱ्या असह्य वेदना हे ह्या विकाराचं प्रमुख लक्षण आहे. त्यांनी आपल्याला होणाऱ्या असह्य वेदनांमुळे कित्येक दिवस ब्रश करणे आणि तोंड धुणे बंद झाल्यामुळे त्यांचे तोंडाचे आरोग्य पूर्णतः बिघडले होते. ह्या वेदना इतक्या वाढल्या की त्यांनी आपले आयुष्य संपविण्याचाही विचार केला होता.

यावर उपाय म्हणून त्या त्यांच्या डेंटीस्टकडे गेल्या आणि वेदना कमी होतील ह्या आशेने बरेचसे दातही त्यांनी काढून घेतले. दुर्दैवाने, त्यांना ह्यामुळे काही फरक पडला नाही. पुढे त्यांनी एका न्यूरोलॉजिस्टकडून काही औषधे घेतली, ज्यामुळे त्यांना थोडाफार आराम मिळाला. पण त्या गोळ्यांमुळे येणाऱ्या गुंगी आणि असंतुलनामुळे त्यांच्यासमोर नवी आव्हाने आ वासून उभी राहिली.

त्याचवेळी त्यांना नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या ‘पेनेक्स’ ह्या पेन मॅनेजमेंट क्लिनिकबद्दल कळाले. ‘पेनेक्स’च्या अनुभवी तज्ञांच्या देखरेखीखाली, त्यांची रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशन सर्जरी करण्यात आली. ह्या प्रक्रियेत अगदी कमीत कमी चिरफाड करून प्रभावित नसांवर काम केले जाते, ज्यामुळे वेदनेपासून त्वरित आराम मिळतो. ही उपचारपद्धती यशस्वी ठरली आणि केवळ दोनच आठवड्यांत त्यांनी आपले जुने औषधोपचार बंद केले.

रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशन झाल्यानंतर गेली दीड वर्षे त्या एका सामान्य, वेदनारहित आयुष्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्रिया त्या आता बिनदिक्कतपणे करू शकत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जगण्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.

या वर बोलताना पेनेक्स क्लिनिक (Painex Clinic) चे डॉ. काशिनाथ बांगर (Dr. Kashinath Bangar) म्हणाले की,
“आमच्या या उपचारा नंतर रुग्णाच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.
या प्रगत उपचार पद्धतीमुळे त्यांना त्वरित आराम मिळाला असून केवळ दोन आठवड्यांत त्यांची औषधे बंद करण्यास
यश मिळाले. त्यांचे जीवन वेदनामुक्त करण्यात आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद आहे आणि हे फक्त
प्रगत अशा वेदना मुक्त उपचारामुळे शक्य झाले आहे.”

जगभरातील १ लाख जणांपैकी अंदाजे ४ ते १३ जण ट्रायजेमिनल न्यूराल्जियाने (Trigeminal Neuralgia)
ग्रस्त असतात. हा विकार दुर्मिळ असला तरी तो असह्य असतो. रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशनसारख्या उपचारपद्धतीच्या
उपलब्धतेमुळे वर्षानुवर्षे पारंपारिक उपचार घेऊनही असह्य वेदनांनी त्रस्त झालेल्या रुग्णांना आशेचा किरण
दिसू लागला आहे.

नाविन्यपूर्ण पेन मॅनेजमेंट उपचारपद्धती पुरविण्यात ‘पेनेक्स’ आघाडीवर आहे.
व्यक्तिगत गरजांनुसार वेगवेगळ्या उपचारपद्धती येथे उपलब्ध आहेत.
अनुभवी तज्ञांची टीम आणि रुग्णसेवेचे ध्येय बाळगणाऱ्या ‘पेनेक्स’मुळे वेदनादायी विकारांशी लढणाऱ्या अनेकांचे जीवन बदलत आहे.

Web Title :  Trigeminal Neuralgia | Radiofrequency Ablation Saves 65-Year-Old Woman from Suicidal Trigeminal Neuralgia

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development | होय, हे परदेशातील नव्हे तर हे आहे आपल्या मुळा-मुठाचे बदलणारे सौंदर्य (PHOTOS)

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून

ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक