प्लास्टिक सर्जरी केल्याने मौनी रॉय झाली TROLL, USERS म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिने बॉलिवूडमध्येही आपली जागा तयार केली आहे. गोल्ड या सिनेमात मौनी पहिल्यांदाच अक्षय कुमार सोबत दिसली होती. यानंतर तिला अनेक सिनेमे मिळत गेले. मौनी बॉलिवूडशी संबंधित अनेक इव्हेंट्स मध्ये वारंवार दिसत असते.

नुकतीच मौनी रॉय सलमान खानच्या भारत या सिनेमाच्या प्रिमिअरमध्ये दिसून आली. मौनीचा हा प्रिमियम लुक सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. तसं पाहिलं तर मौनी खूपच स्टायलिश लुकमध्ये आली होती. परंतु मौनीचा चेहरा पाहता अनेकजण हैराण झाल्याचे दिसून आले.

https://www.instagram.com/p/ByLFekeBQ7v/?utm_source=ig_embed

तुम्ही फोटो पाहिले तर लक्षात येईल की मौनीचा चेहरा खूपच सुजल्याचे दिसत होते. मौनीच्या सुजलेल्या चेहऱ्यामुळे ट्रोलर्सने तिला चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून आले. अनेकांनी भलत्याच कमेंट केल्याचे दिसत आहे. एक युजर म्हणतो की, ‘सिलिकॉनची तर मर्यादाच ओलांडली आहे.’ आणखी एक युजर म्हणतो की, ‘लिप्स सुजून सुजून कुठे पडतील.’ एवढेच नाही तर अनेक लोकांनी तिला आयटम डान्सर राखी सावंत सोबतही कंपेअर केल्याचे दिसून आले.

तुम्हाला सांगू इच्छितो की, याआधीही मौनी रॉयच्या प्लास्टिक सर्जरीवर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे मौनी खूप भडकली देखील होती. काही रिपोर्ट्सनुसार, काहींना तर मौनी मुलाखत देणारच नाही असेही म्हणाली होती.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर मौनी लवकरच राजकुमार रावच्या मेड इन चायना या सिनेमात दिसणार आहे. मौनीचा हा सिनेमा 30 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.