खंडणी दिली नाही म्हणून तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – दुकानातील कामगारांनी खंडणी दिली नाही म्हणून दोन दुकानांची आणि दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.

या प्रकरणी आझमआलम मोहमंदआलम शेख (३०, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर वैभव सुरेश माने (२२, रा. दत्तनगर, चिंचवड), अनिकेत राजेंद्र महाबरे (१८), कुणाल लिडकर, किरण राठोड (तिघे रा. भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे त्यांच्या कामगारासह दुकानात काम करत असताना आरोपी तेथे आले आणि त्यांनी शेख यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी शेख यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी चिडून शेख यांच्या दुकानाची तोडफोड करत त्यांना कोयत्याने मारहाण केली.

दुकानाच्या गल्ल्यातील 3 हजार 500 रुपये घेतले तसेच जवळच असणाऱ्या आरीफ शेख यांच्याही दुकानाची तोडफोड करीत दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केली. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.