धक्‍कादायक ! काजुच्या टरफलांनी भरलेल्या ट्रकमध्ये २.५ कोटींचा गांजा, दोघे अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका मोठ्या आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. मोहम्मद काजिम आणि दिनेश असे या दोघांचे नाव आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, दिल्लीतील अनेक मार्गांनी गांजासारख्या अंमली पदार्थांची अवैधपणे वाहतूक केली जात आहे. त्याचदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली कि, नागालँडची नंबरप्लेट असलेल्या एका गाडीतून गांजाची वाहतूक केली जात आहे. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकवर पाळत ठेवली असता त्यांना माहिती मिळाली कि, बवाना मार्गे हा ट्रक दिल्लीमध्ये येणार आहे.

त्यानंतर पोलिसांनी या ट्रकवर पाळत ठेवून त्या ट्रकची चौकशी केली असता त्यांना ट्रकमध्ये काजूचे टरफले दिसून आली. मात्र पोलिसांनी ट्रकची कसून चौकशी केली असता काजूच्या आतमध्ये लपवून ठेवलेला आठशे किलो गांजा सापडला. पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. या सर्व घटनेचा मास्टरमाईंड हा उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर मध्ये बसून हे सगळे करत होता. त्यानेच दोन ट्रक घेऊन दिनेशला चालवायला दिले होते.

दिनेश हा ट्रक घेऊन विशाखापट्टणमला जात असे. त्यानंतर मालकाने सांगितलेल्या ठिकाणाहून तो गांजा ट्रकमध्ये भरत असे. गांजा भरल्यानंतर तो ट्रक घेऊन कधी राजस्थान, कधी उत्तर प्रदेश तर कधी दिल्लीला जात असे. पोलिसांनी सांगितले कि, या एका फेरीसाठी दिनेश याला चाळीस हजार रुपये तर काजिम याला पन्नास हजार रुपये दिले जात असत. यानंतर पोलीस या गँगच्या मास्टरमाईंडच्या मागावर असून लवकरच त्याला देखील अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या