तृप्ती देसाई फरार, अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात जामीन नाकारला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. विजय मकासरे यांनी तृप्ती देसाईच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटी अंतर्गत तक्रार दिली होती.

मकसरे यांनी दरोडा मारहाण आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा तृप्ती देसाईंविरूद्ध दाखल केलेला आहे. देसाई यांनी पुणे न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज केला होता. पण दोन्हीकडे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. देसाई सध्या फरार असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण 
तृप्ती देसाई यांनी आपल्या काही मित्रांसह मकसरे यांना बालेवाडी परिसरात एकटे गाठून , त्यानंतर त्यांचा मोबाईल त्यांच्याकडून हिसकावून घेतला. त्यांना मारहाणही केली. तसंच तृप्ती देसाईंनी मकासरे यांना त्यांच्या जातीवरून अश्लील शिव्याही दिल्या. अशी माहिती मकसरे यांनी आपल्या फिर्यादीत दिलेली आहे.