Tulsi che Fayde | ‘या’ 5 आजारांच्या उपचारात अतिशय प्रभावी आहेत तुळशीची पाने, शरीर बनवतात निरोगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tulsi che Fayde | गेल्या दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग सतत चिंतेत आहे. या आजाराच्या तीन लाटा आल्या आहेत, ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. हा आजार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू नये, यासाठी तुम्हाला त्यांची इम्युनिटी वाढवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या काही दुर्मिळ गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला केवळ कोरोनापासूनच नाही तर इतर गंभीर आजारांपासूनही वाचवू शकता. तुळशीचे ते दुर्मिळ गुणधर्म कोणते आहेत जाणून घेऊया. (Tulsi che Fayde)

 

तुळशीच्या पानांचे फायदे

1. पाचक प्रणाली मजबूत करते
भूक कमी असेल आणि पचनशक्ती कमजोर होत असेल तर तुळशीच्या पानांशी संबंधित उपाय करा. रोज सकाळी तुळशीची 4-5 पाने कोमट पाण्याने धुवून खावीत. असे केल्याने तुमची पचनशक्ती सुधारते, भूक वाढते आणि रक्त शुद्ध होते. या उपायाने स्मरणशक्ती सुद्धा वाढेल. (Tulsi che Fayde)

 

2. कानदुखीच्या सूजमध्ये फायदा
ज्या लोकांना अनेकदा कानात वेदना होतात किंवा कानाच्या खालच्या भागात सूज येते. त्यांच्यासाठीही तुळस रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कान दुखत असल्यास 3-4 तुळशीची पाने थोड्या पाण्यात टाकून गरम करा. यानंतर त्या पाण्याचे 2-2 थेंब थोड्या वेळाने कानात टाका. कानाच्या दुखण्यापासून थोड्याच वेळात आराम मिळेल. कानाच्या मागील बाजूस सूज असल्यास तुळशीची पाने बारीक करून कोमट पाण्यात मिसळून प्या. यानंतर ती पेस्ट सुजलेल्या भागावर लावा. असे केल्याने तुम्हाला दुखण्यात आराम मिळेल.

 

3. बॅक्टेरियल इन्फेक्शन करते दूर
शरीराची इम्युनिटी कमकुवत असतानाही तुळशीच्या पानांचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बॅक्टेरिया इन्फेक्शन, पोटदुखी, ताप, सर्दी, मळमळ आणि हृदयाशी (Abdominal Pain, Fever, Cold, Nausea, Heart) संबंधित आजारांपासून आराम मिळतो. तुळस 2 प्रकारची असते, त्यापैकी एक राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस आहे. राम तुळशीच्या तुलनेत कृष्ण तुळशीला औषधी गुणधर्माच्या दृष्टीने अधिक फायदेशीर मानले जाते.

4. रातांधळेपणाच्या उपचारात फायदा होतो
ज्या लोकांना रात्री न दिसण्याची समस्या आहे ते देखील तुळशीने उपचार करू शकतात. रातांधळेपणा असल्यास दररोज रात्री तुळशीच्या रसाचे 2-3 थेंब डोळ्यात टाकल्याने आराम मिळतो. याशिवाय तुळशीचा रस नाकाशी संबंधित आजारांच्या उपचारातही खूप उपयुक्त ठरतो. तुळस बारीक करून त्याचा वास घेतल्यास नाकाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

 

5. केस मजबूत करण्यासाठी प्रभावी
मानसिक तणावामुळे तुमचे केस गळत असतील किंवा उवा होत असतील तर तुळशीची पाने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तुळशीच्या पानांचा रस काढून केसांना लावा, केस पुन्हा वाढू लागतील आणि उवा नष्ट होतील. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीमध्ये आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tulsi che Fayde | tulsi che fayde benefits of tulsi leaves how to consume tulsi leaves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

 

Acidity Problems | अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहात का? करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ताबडतोब होईल परिणाम

 

Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’