‘या’ दिवशी अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल सोबत लग्न करणार आदित्य नारायण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अलीकडेच त्याच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर आला होता. आदित्यनंच हा फोटो शेअर करत सांगितलं होतं की, तो दीर्घकाळापासून अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हिला डेट करत आहे. यानंतर लगेचच आदित्यचे फोटो समोर आले होते. आता त्याच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

1 डिसेंबर रोजी करणार लग्न
एका इंग्रजी वृत्तानुसार, आदित्य नारायण त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत पुढील महिन्यात म्हणजेच 1 डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. कोरोनामुळं यात फक्त 50 लोकांचीच उपस्थिती असणार आहे. या फक्त जवळचे लोक आणि नातेवाईक असतील असं आदित्यनं सांगितल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

अलीकडेच आदित्यनं श्वेतासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, आम्ही लग्न करणार आहोत. मी जगातील सर्वांत लकी माणूस आहे ज्याला 11 वर्षांपूर्वी श्वेता भेटली. माझी सोलमेट. आता फायनली आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करत आहोत. आम्हाला दोघांनाही आमचं खासगी आयुष्य खासगी ठेवायला जास्त आवडतं. लग्नाच्या तयारीसाठी आता सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. आता डिसेंबरमध्ये भेटूयात.

You might also like