Bigg Boss 14 : राहुल वैद्यनं दिशाला केलं लग्नासाठी ‘प्रपोज’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवरील सर्वांत फेमस शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) हळूहळू खूपच मजेदार होताना दिसत आहे. या शोमधील स्पर्धक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आज आपली गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) हिच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसणार आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओची खूप चर्चा होताना दिसत आहे.

राहुलनं दिशाला अशा अंदाजात केलं प्रपोज !
राहुल दिशाला प्रपोज करताना एवढा इमोशनल झाला होता की, त्याला पाहून घरातील इतर सदस्यदेखील भावुक झाले होते. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे जिचं नाव आहे दिशा परमार असं म्हणत राहुलनं दिशाला थेट लग्नासाठी मागणी घातली. राहुलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनीदेखील या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजच्या भागात दिशा देणार राहुलच्या प्रपोजलचं उत्तर
राहुलनं दिशाला प्रपोज केल्यानंतर सर्व स्पर्धक शिट्टी वाजवत जल्लोष करू लागले. राहुल दिशाला म्हणाला की, मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन. दिशा नेमका काय निर्णय घेते ते येणाऱ्या भागातच कळेल. यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पाहावा लागेल.