कपिल शर्मानं कमी केलं 11 किलो वजन ! जाणून घ्या कसा ‘फॅट टू फिट’ झाला कॉमेडीयन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या फिटनेसची खूप काळजी घेत असतो. 2018 मध्ये त्याचं वजन अचानक वाढलं होतं, ज्यानंतर या वर्षी कपिलनं आपलं 11 किलो वजन कमी केलं आहे. आधी तो 92 किलोचा होता आणि आता तो 81 किलोचा झाला आहे. फिटनेसमुळं तो खूप अटेंनश घेत आहे. सध्या त्याच्या ट्रान्सफॉर्मशनची खूप चर्चा होताना दिसत आहे.

तसं तर कपिलनं कधीच त्याच्या ट्रान्सफोर्मेशनवर खुलून भाष्य केललं नाही. पंरतु त्याची प्रगती पाहून हे दिसत आहे की, त्यानं खूप मेहनत घेतली आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात कपिलनं वजन केल्याचं सांगितलं होतं. यात दिसणाऱ्या अर्चना पूरण सिंह हिनं सांगितलं होतं की, कपिलनं बोलताना खुलासा केला होता की, त्यानं त्याचं वजन कसं कमी केलं आहे.

या व्हिडीओत कपिल असं सांगताना दिसत आहे की, आधी तो 92 किलोचा होता आणि आता तो 81 किलोचा झाला आहे. या वर्षी त्यानं 11 किलो वजन कमी केलं आहे.