Kaun Banega Crorepati 12 : केबीसीमध्ये आलेल्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याकडून लग्नाबाबत करून घेतले ‘हे’ खास आवाहन

नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा कौन बनेगा करोडपतीचे होस्ट म्हणून परतले आहेत. ते कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनला होस्ट करत आहेत. अलिकडच्या कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये स्पर्धक चंदेश्वर साटेकर हॉट सीटवर बसलेले दिसले.

त्यांचा इंट्रोडक्शन व्हिडिओ पाहून बिग बी गंमतीत म्हणाले, तुम्ही तुमच्या जीवनात काहीही करा, परंतु आपल्या विवाहाचा दिवस नेहमी लक्षात ठेवा, कारण बायका याबाबतीत खुप संवेदनशील असतात. यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांना सल्ला दिला, ते अशाप्रकारची तारीख आपल्या फोनच्या कॅलेंडरमध्ये सेव्ह करू शकतात. चंदेश्वर यांच्या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये ते सांगतात की, त्यांनी लव्ह मॅरेज केले आहे आणि ते खुपच अनपेक्षित स्थितीत झाले आहे.

त्यांच्या कुटुंबाने हे लग्न आता स्वीकारले आहे. तर त्यांची पत्नी हर्षिताच्या कुटुंबियांनी अजूनही हे लग्न स्वीकारलेले नाही आणि त्यांच्यासोबतची सर्व नाती तोडली आहेत. यानंतर चंदेश्वर हे सुद्धा म्हणतात की, ते या शोमध्ये यासाठी सुद्धा येत आहेत की, जेणेकरून ते आपल्या पत्नीच्या कुटुंबियांचे मन जिंकू शकतील आणि इतके पैसे जिंकतील की ते सरकारी परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी शिकू शकतात. तेव्हा अमिताभ बच्चन हर्षिताच्या कुटुंबियांना निवेदन करतात की, त्यांनी दोघांच्या विवाहाला स्वीकारावे. चंदेश्वर आपल्या सर्व लाइफ लाइनचा वापर करून केवळ एक लाख साठ हजार रूपयेच जिंकू शकले.

यापूर्वी डॉ. श्रुती सिंह आल्या होत्या आणि त्या 25 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नव्हत्या आणि साडेबारा लाख रूपये जिंकून गेल्या. पुन्हा एकदा केबीसीला महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहे आणि हा गेम शो रोचक बनवत आहेत.

You might also like