प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा ‘गौप्यस्फोट’, म्हणाली – ‘मालिका बंद होऊन 5 वर्षे झाली तरीही….

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा आणि भाई जातिवादाचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हिनंही तिच्या आयुष्यातील एक सत्य सांगितलं आहे.

कवितानं एक ट्विट केलं आहे. कविता म्हणते, “कालच मला याची आठवण करून दिली गेली आहे की, जर मी कुठे हरियाणा पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका करताना दिसले तर माझ्याविरोधात खटला दाखल केला जाईल. परंतु शो बंद होऊन तर 5 वर्षे झाली आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षकही ही मालिक सुरू करण्यासाठी सतत मागणी करत आहेत. परंतु गेल्या 5 वर्षात ही मालिका पुन्हा सुरू झाली नाही आणि तुम्ही मुव्ही माफीयांबद्दल बोलत आहात. वाह.”

कविता प्रसिद्ध मालिका एफआयआरमधील चंद्रमुखी चौटाला बद्दल बोलत आहे. तिचा आरोप आहे की, शोचे मेकर्स आता दुसऱ्या शोमध्ये तिला हरियाणा पोलिसाची भूमिका करू देत नाहीत. आणि आता तेच लोक मुव्ही माफियाबद्दल बोलत आहेत.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिची डू नॉट ड्रीम ही शॉर्ट फिल्म रिलीज आहे. अभिनव शुक्ला डायरेक्टेड या सिनेमाचं एडिटींगपासून तर प्रॉडक्शनपर्यंतचं सर्व काम कविताचा पती रोनित बिस्वास यानं सांभाळलं आहे. ही एक 13 मिनिटांची हॉरर फिल्म आहे. कवितां घरीच याची शुटींग केली आहे. एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिनं टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कवितानं कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे.