काय सांगता ! होय, जुळया ‘रेसलर’ बहिणी एकाच दिवशी ‘प्रेग्नंट’, निकी बेलानं ही गोष्ट सांगितली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – WWE मधील प्रसिद्ध जुडवा रेसलर सिस्टर्स निकी बेला आणि ब्री बेला एकाच वेळी प्रेग्नंट आहेत. निकी आणि ब्री यांनी स्वत: या बाबत सोशलवरून माहिती दिली आहे. ब्रीनं म्हटलं आहे की, “आम्ही सगळे हैराण आहोत. आम्ही कधीच विचार केला नव्हता की, असं एकाच वेळी आम्ही प्रेग्नंट राहू. असं समजत आहे की आमची मुलं एकाच वेळेस येणार आहेत. आम्ही खूप एक्सायटेड आहोत.”

36 वर्षीय निकी म्हणते, “माझ्या आठवड्याची सुरुवात चांगली झाली. मला वाटलं ओह माय गॉड. मी प्रेग्नंट आहे. मी यासाठी तयार नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे थांबा जुळ्या बहिणी एकाच वेळेस प्रेग्नंट आहेत?” निकी सध्या रेसलर जॉन सीनापासून वेगळं होत आर्टेम चिगविंटसेव या एका डान्सरला डेट करत आहे. निकी आणि आर्टेमनं काही वर्षांपूर्वीच ‘डान्सिंग विद द स्टार्स’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ब्री आपल्या रेसलर पती डॅनियल ब्रायनसोबत दुसऱ्या बाळाची वाटत पहात आहे. निकी आणि आर्टेमनं यांनी जानेवारीत साखरपुड्याची घोषणा केली होती.