संतापजनक ! कोरोनाबाधित वडिलांसाठी ‘ती’ शोधत होती ऑक्सिजन सिलिंडर, शेजार्‍याने मुलीकडे केली शरीर सुखाची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने कहर केला आहे. दैनंदिन बाधितांची संख्या देखील वाढत आहे. अनेक रुग्णाचा बळी जात आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या नातेवाईकाला वाचवण्यासाठी ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड्स, व्हेन्टिलेटर मिळवण्यासाठी अतोनात धडपड करत आहेत. अशातच एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोरोना बाधित वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडर्सच्या शोधात असणाऱ्या तरुणीकडे एका शेजाऱ्याने सेक्सची मागणी केल्याचा भयानक प्रकार ट्विटरच्या माध्यमातून पुढं आला आहे.

 

 

 

 

 

अधिक माहिती अशी, एका तरुणीचे वडील कोरोनाबाधित आहेत. वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेण्यासाठी ती तरुणी धडपड करत होती. त्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्या तरुणीकडे ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. अत्यंत घृणास्पद भाषेत त्या व्यक्तीने पीडित तरुणीकडे सेक्सची मागणी केली. भावरीन कंधारी या तरुणीने समाज माध्यमातून या घटनेला वाचा फोडली आहे. या प्रकारावरून अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे.

देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना माणुसकीला काळीमा घटना समोर येत आहे. लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. त्या तरुणीने हा लज्जास्पद प्रकार सर्वांसमोर आणला आहे. सोशल मीडियावर या प्रकाराविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.