घुसखोरीसाठी ‘ते’ दोघे गादीत लपले, आणि…

लंडन : वृत्तसंस्था – एखाद्या देशात किंवा एखाद्या ठिकाणी घुसखोरी करण्यासाठी अनेक उपाय करतात. यातील बरेच प्रकार आश्चर्यकारक असतात तर काही एकदम हास्यास्पद असतात. काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये आफ्रिकेतून दोन तरुणांनी चक्‍क गादीत पोकळ जागा करून त्यामध्ये झोपून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ स्पॅनिश सिनेटर जॉन एनरितू यांनी शेअर केला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देशांमध्ये वाढलेली यादवी, दहशतवादी हल्ले, गरिबी व बेरोजगारी यामुळे लोक परागंदा होत आहेत. अनेक लोक दुसर्‍या देशात जाऊन उदरनिर्वाहाची साधने व आसरा शोधत आहेत. त्यामधून असे प्रकार वाढले आहेत.
हे दोन तरुणही आफ्रिकेतून आले होते. ते गादीच्या आता झोपून वरून गादीचे कव्हर घातले होते. यामुळे श्‍वास कोंडून मृत्यू येण्याचा धोकाही त्यांनी पत्करला होता. पोलिसांनी या गाद्या जप्‍त करून वरचे कव्हर फाडून या तरुणांना बाहेर काढले.
युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीकडून प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार अशाच बेकायदेशीर व धोकादायक कृत्यांमुळे गेल्यावर्षी 2200 लोकांचा युरोपमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू झाला.