पुण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या बांधकामावर माथाडीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्याला दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बंडगार्डन येथील रुबी हॉल रुग्णालयाच्या आवारात बांधकाम सुरु असलेल्या सुपर स्पेशालिटी कॅन्सर सेंटरच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडत माथाडीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

बाबू वसंत ननावरे(वय ३०, रा. ताडीवाला रोड) गौतम आप्पा जगदाळे (वय २४, रा. ताडीवाला रोड),अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
रुबी हॉल क्लिनिकच्या आवारात नवीन सुपर स्पेशालिटी कॅन्सर सेंटरच्या इमारतीचे काम सुरु आहे. अमित कन्सल्टंट या कंपनीस पाच मजली इमारतीचे प्लंबिंग व फायर फायटिंग सिस्टम चे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे. हिरालाल श्रीनाथ यादव (वय ४४, रा.ताडीवाला रोड पुणे) हे अमित कन्सल्टंट आणि इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुपरवायझरचे काम करतात. ही कंपनी नवीन इमारतीमध्ये प्लंबिंग व फायर फायटिंग सिस्टम बसवण्याचे काम करते. सुपरवायझर व कामगार तेथे काम करीत असताना स्थानिक माथाडी कामगार संघटनेचे लोक तेथे कोणतेही काम न करता माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली वारंवार जाऊन माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली दम देऊन, कामगारांना बिल्डिंगचे वरून फेकून देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. कंपनीचे मालकाकडून वेळोवेळी चेक व रोख रकमेच्या स्वरूपात ८० हजार रुपये जबरदस्तीने घेतले. त्यानंतर पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी याचा तपास करून पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निखील पवार, आनंद रावडे, कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसो कोंढरे, रमेश गरूड, प्रमोद मगर, हनुमंत गायकवाड, प्रकाश मगर, संतोष मते, मनोज शिंदे, पांडुरंग वांजळे, विजय गुरव, फिरोज बागवान, शिवानंद बोले, सचिन कोकरे, अमोल पिलाने, मंगेश पवार, प्रविण पडवळ, नारायण बनकर, उदय काळभोर, महेश कदम यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा