नशेसाठी रिक्षा चालकाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई | पोलीसनामा आॅनलाइन – मुंबई येथील मीरारोड भागात एका रिक्षा चालकास लुटण्यासाठी त्याची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थांचे व्यसन करण्यासाठी त्यांना पैसे हवे होते. त्यासाठी त्यांनी रिक्षाचालकाकडे पैश्यांची मागणी केली त्याने विरोध केला असता त्याची हत्या करण्यात अली. यावर काशिमीरा पोलिसांनी कारवाई करून प्रथम या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली होती.
संजय धनेश्वर यादव (२८) असे या रिक्षाचालकाने नाव असून तो दहिसर भागातील रावळपाडा येथे राहत होता. संजय हा जखमी अवस्थेत काही दिवसांपूर्वी मीरा-गावठण येथील श्याम इंडस्ट्री इस्टेट जवळ आढळला होता. त्यावर उपचार सुरु असताना उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबद रिक्षातून खाली उतरत असतांना अचानक तोल जावून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवत काशिमीरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
संजयचा मोबाईल त्याचबरोबर त्याच्याजवळ असणारी रोख रक्कम देखील गायब असल्याने स्थानिक पोलिसांना संशय आल्याने याबाबत तपास सुरु केला. मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु होता. तपासादरम्यान उद्धव उर्फ रुद्र श्रीकांत उकरंडे (१९) व विकास उर्फ सर्किट सुरेश परेड (वय १९ दोघेही रा.महाजन वाडी) या दोघांची नावे समोर अाली दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान संजय यादव यांचा मोबाईल आरोपींकडे सापडला.
हे दोघे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संजय यादव यांच्या रिक्षात बसले होते. त्यांना निर्जनस्थळी नेऊन पैश्यांची मागणी करू लागले त्याने विरोध केला असता मारहाण करून पैसे काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मारहाणीत संजयचे डोके भिंतीवर आदळले याचा फायदा घेऊन संजय जवळील मोबाईल आणि ९०० रुपये घेऊन दोघेही तेथून पसार झाले.