home page top 1

वीज घरावर कोसळून २ चिमूरड्यांचा अंत

ओतूर : पोलीसनामा ऑनलाईन – वीज घरावर कोसळून घरात खेळत असलेल्या दोन चिमुलकल्यांचा घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने मृत्यू झाला आहे. तर त्यांची आजीही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ओतूर जवळील तेलदरा येथे घडली.

कात्रिक बापू केदार (वय २ वर्षे), वैष्णवी विलास भुतांबरे (वय ६) अशी दोन मुलांची नावे आहेत. तर चिमाबाई बापू केदार (वय ६०) या जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

आज मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वारे, आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. त्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अर्धा तास पाऊस बरसला. त्यावेळी तेलदरा वस्ती येथील ठाकर समाजाच्या आदीवासी वस्तीतील एक कच्चे बांधकाम झालेल्या घरावर वीज कोसळली. त्यात घर पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. त्यावेळी घरात दोन्ही चिमुरडे खेळत होते. त्यात कार्तिक आणि वैष्णवी हे दोघेही भिंतींच्या ढीगाऱ्याखाली सापडून ठार झाले. तर शेजारी बसलेली आजीदेखील गंभीर जखमी झाली. मोठा आवाज झाल्याने वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांनी मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?
‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

Loading...
You might also like