बीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामपंचायतमधील रजिस्टर फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. बाबू भिमराज देवकर आणि बापूराव भिमराज देवकर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार ऑक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्ह्यातील लोणी सय्यदमीर ग्रामपंचायत कार्यालयात घडला होता.

अतिक्रमणाची नोंद केल्याच्या कारणावरुन देवकर बंधूंनी ग्रामपंचायत कार्यालयत येऊन गोंधळ घातला. तसेच ग्रामसेवकाच्या टेबलवर असलेले इमारती व जमीनीचे आकारणीचे रजिस्टर फाडले. याप्रकरणी ग्रामसेवक अरविंद रासकर यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी दोघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या प्रकरणाची सुनावणी पाचवे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्य़ादी ग्रामसेवक अरविंद रासकर, घटनास्थळ पंच प्रसाद आरु, साक्षीदार दत्तात्रय सासवडे, राजेंद्र खुळे आणि तपासी अंमलदार सुदाम शिरसाट यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. तसेच सरकारी वकील राम बिरंगळ यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी काम पाहिले तर पोलीस कॉन्स्टेबल बिनवडे यांनी सहकार्य़ केले.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like