भोसरी : इंद्रायणीनगर येथे दोन गटात हाणामारी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

 

इंद्रायणीनगर भोसरी येथे गाडीची धडक लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना आज (रविवार) संध्याकाळी घडली. यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये आणले असता तेथेही दोन गटात पुन्हा हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही गटाला शांत केले असून जखमीना उपचारासाठी एडमिट केले आहे. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोघेही किरकोळ जखमी आहेत. मात्र, या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.