मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वेगाडया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  मध्य रेल्वेकडून मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१७५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून शनिवारी २७ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. ती गाडी दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी १.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१७६ नागपूरवरून रविवारी २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६.२० वाजता सुटणार आहे. ती गाडी दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ८.१५ वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामनगाव, पुलगाव आणि वर्धा या स्थानकावर थांबणार आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये २ एसी टू टायर, ३ एसी थ्री टायर, ८ स्लीपर आणि ५ सेकंड क्लास सीटिंग कोच असणार आहेत.