इम्रान खान यांना मिळाली ‘ड्रायव्हिंग’ आणि PM मोदींना मिळाला ‘सर्वोच्च सन्मान’, PAK पीएमचं जगात झालं ‘हसू’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल पाकिस्तान संधी मिळताच भारताच्या विरोधात जरी वक्तव्य करत सुटला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काय प्रतिमा आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. उदाहरणच द्यायचे म्हटले तर, ज्या संयुक्त अरब अमिरात या देशाच्या नेत्यासाठी पाकचे पंतप्रधान ड्रायव्हर बनले होते. त्याच देशाने मोदी यांना त्यांच्या देशातल्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच ‘ऑर्डर ऑफ जायेद’ ने गौरवले आहे. यावरून समाजमाध्यमांवर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. हाच धागा पकडून समाज माध्यमवीरांकडून इम्रान खान यांना टार्गेट केले जात आहे.
PM-Modi1
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे इम्रान खान चालक बनले होते. नुकतच सौदी अरेबियाने मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान बहाल केल्यामुळे या दोन्ही गोष्टींची लोक तुलना करताना दिसत आहे.
Imran-Khan
हे सर्व तेव्हा पासून सुरु झाले होते जेव्हा पाकमधील एक महिला खासदाराने इम्रान खानला संसदेत ड्रायवर असे संबोधले होते. त्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांनी पाकिस्तानी प्रधानमंत्र्यावर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आता मोदींना ऑर्डर ऑफ जायेद भेटल्यानंतर या खासदाराच्या त्या वक्तव्यामुळे मीडिया वर ट्रोलिंग सुरु झाली आहे.
Pak-Parliament
ऑक्सफर्ड मधून शिक्षण अन् बनला ड्रायवर
आलोक भट्ट नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने उपहासात्मक ट्विट करताना असे लिहिले की , पीएम मोदींना ‘ऑर्डर ऑफ जायेद’ मिळतोय तर ऑक्सफर्डमधून शिक्षण घेणारा बनला जातोय ड्रायव्हर असे त्याने ट्विट मध्ये लिहिले आहे.
PM-Modi-Award
अभिजित मुजुमदार या नेटकऱ्याने तर चक्क मोदींना आजपर्यंत भेटलेल्या पुरस्कारांची लिस्टच टाकली आहे. त्यांनी पुढे हे ही दिले आहे, कोणत्या देशाने मोदींना कोणता पुरस्कार दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –