Uday Samant attack In Pune | उदय सामंत हल्ला प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant attack In Pune | शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात (Uday Samant attack In Pune) आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे (Shiv Sena Pune City President Sanjay More), सुरज लोखंडे (Suraj Lokhande), संभाजी थोरवे (Sambhaji Thorve), राजेश पळसकर (Rajesh Palaskar), चंदन साळुंके (Chandan Salunke), बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी राजेश पळसकर, संभाजी थोरवे, संजय मोरे, सुरज लोखंडे, चंदन साळुंके यांना आज पहाटे अटक केली. या आरोपींवर आयपीसी 307, 353, 332, 109, 143, 147, 148, 149, 427, 504, 506, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टनुसार गुन्हा (FIR) दाखल केला. याप्रकरणी विराज सावंत (Viraj Sawant) यांनी फिर्याद दिली. आरोपींना पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली.

 

उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्यानंतर (Uday Samant attack In Pune) पुणे पोलिसांनी कारवाई केली. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक (Arrest) करण्यात आली होती. या पाच जणांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी कात्रज चौकामध्ये आमदार उदय सामंत यांचे गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपींना आज शिवाजीनगर कोर्टात हजर केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तपाडिया (First Class Judicial Magistrate P.G. Tapadia) यांनी पोलिसांची आठ दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.

 

आरोपीतर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. विजय सिंह ठोंबरे (Adv.Vijay Singh Thombre) यांनी सदरचा गुन्हा हा खोटा व बनावट असून आमदार सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्यामध्ये एकही शिवसेना पदाधिकारी सहभागी असल्याचे दिसून येत नाही. तरीसुद्धा केवळ सर्वजण शिवसेनेचे पदाधिकारी व शहराध्यक्ष असल्याने त्यांच्यावर राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपीविरुद्ध कलम 307 लागू होत नाही तसेच कलम 353 चा प्रश्नच येत नाही. फिर्यादी हा सरकारी कर्मचारी नाही. आरोपी क्रमांक 6 बबनराव नारायण थोरात हे मूळचे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख असून घटनास्थळावर ते उपस्थित नव्हते. त्यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. यावरून गुन्हा हा राजकीय आकसापोटी या आरोपींवर दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी बाकी नाही त्यामुळे सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला.

 

तसेच सदर रिमांड वेळी अ‍ॅड. मयूर लोढा (Adv. Mayur Lodha) व अ‍ॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil) यांनी देखील युक्तिवाद केला. सरकारी वकील वर्षाराणी जाधव (Public Prosecutor Varsarani Jadhav) यांनी 8 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सदर प्रकरणातील आरोपींस पुन्हा 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करणार आहेत.

 

नेमकं काय घडलं ?

आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोघेही कात्रज परिसरात येणार होते.
त्यामुळे या परिसरात अगोदर पासून तणाव होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.
आदित्य ठाकरे हे सभेनंतर थेट मुंबईला जाणार होते.
ठाकरे यांनी अचानक शंकर महाराज मठाचे (Shankar Maharaj Math) दर्शन घेणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी स्वारगेटकडील रस्ता क्लिअर केला. तोपर्यंत ठाकरे यांचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे आगोदर गेला.
मात्र उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. त्यावेळी सभा संपल्यानंतर संपूर्ण चौक शिवसैनिकांनी भरला होता.
उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या.
त्याच गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहताच पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या गाडीला वाट करुन दिली.

 

Web Title : –  Uday Samant Attack In Pune | 3 days police custody for accused in uday samant attack case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा