Uddhav Thackeray | खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी राज्यात आतंकवाद फोफावण्यास पोषक वातावरण निर्माण केले – भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून शुक्रवारी विधानसभेत अपक्ष आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोल्हे यांची काही गुंडांनी हत्या केली होती. त्यावेळी काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता. त्यांनी आयुक्तांना हे प्रकरण दाबण्यास सांगितले होते. तसेच महाविकास आघाडीने हा हत्येचा गुन्हा असून देखील चोरीच्या गुन्ह्याचा तपास केला होता, असा मोठा आरोप राणांनी ठाकरेंवर केला होता. त्यावर आता भाजपने देखील त्यांची री ओढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात आतंकवाद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण केले होते, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत एक ट्वीट करण्यात आले आहे. “उद्धव ठाकरे तुम्ही आतंकवाद्याना वाचवत होता का? अमरावतीमध्ये मेडीकल व्यावसायीक उमेश कोल्हे यांची हत्या आतंकवाद्यानी केली होती. काही दिवसानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. चर्चेनंतर घडलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1. 21 जून 2022 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे यांना आयएसआयएस मानसिकतेच्या जिहादींनी गळा चिरून ठार केले. अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने केली असे सांगत तपासाला वेगळे वळण देऊन तपास भरकटविण्याचा प्रयत्न केला.

2. 21 जून 2022 ते 2 जुलै 2022 पर्यंत अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, हेच माध्यमांना सांगितले. भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतरही पोलीस या घटनेच गांभीर्य समजून घ्यायला तयार नव्हते.

3. उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असे नमूद करून, या हत्याकांडातील आतंकवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणला होता.

4. राजस्थान मध्ये कन्हैयालाल हत्याकांडाचा तपास एनआयएने सुरू केला. तेव्हा एनआयएच्या भीतीने 2 जुलै 2022 रोजी तब्बल 12 दिवसांनी अमरावती पोलिसांना उमेश कोल्हे प्रकरणात आतंकवादी कट दिसला.

5. अमरावती पोलिसांनी 2 जुलै रोजी पत्रक काढून जाहीर केले की, उमेश कोल्हेची हत्या ही आयएसआयएस मानसिकतेच्या जिहाद्यांनी केली.

6. उमेश कोल्हे प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांची चौकशी होणे
गरजेचे आहे.

त्यामुळे खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी राज्यात आतंकवाद फोफावण्यात पोषक वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

उमेश कोल्हे हे उजव्या विचारांचे हिंदुत्वादी कार्यकर्ते होते. त्यांनी नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर
केलेल्या आक्षेपार्ह टिपणीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारीत केली होती. त्यातून त्यांची हत्या झाली होती.
पण या प्रकरणाचा तपास महिनाभर चोरीच्या गुन्ह्याखाली केला गेला.
यासाठी काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता.
उमेश कोल्हे हत्याप्रकरण दाबवण्याचा प्रयत्न देखील ठाकरेंनी केला, असा आरोप भाजपने केला आहे.

Web Title :- Uddhav Thackeray | bjp criticized uddhav thackeray on amravati umesh kolhe murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Death Due To Heart Attack | दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Sanjay Raut | शिंदे सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज, रेशन वाटावे तसे एसआयटी वाटत सुटलेत – संजय राऊत