Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

नागपूर : Uddhav Thackeray | सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) आक्रमक झालेल्या विरोधकांना शांत करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून विविध डावपेच खेळले जात आहेत. शिवसेना ठाकरे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) एसआयटी चौकशी करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी चालवली आहे. मात्र, या दबावाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाच आव्हान दिले आहे. ते विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्यापासून भीती असते, त्यांच्यावर आरोप केले जातात. पण, आम्हालाही एसआयटी चौकशी लावता येतील. त्यामुळे त्यांनी त्याच्यात जाऊ नये. अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू.

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार
(Ajit Pawar) यांना पाठवलेल्या पत्रावरून देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाला घेरले. ते म्हणाले, नवाब मलिकांना दूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. तोच न्याय प्रफुल्ल पटेलांबाबत (Praful Patel) लावणार आहात की नाही? (Uddhav Thackeray)

तर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aeservation) प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी
शिवसेनेच्या खासदार राष्ट्रपतींना भेटले. ज्यांना आरक्षण असेल, त्यांना आरक्षण द्यावे.
पण, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

Bombay High Court | ‘लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग नाही’, कोर्टाकडून आरोपीची निर्दोष सुटका