UGC NET 2021 परीक्षेसाठी पुन्हा उघडली रजिस्ट्रेशन विंडो, ‘या’ 7 स्टेप्सद्वारे करा अप्लाय; जाणून घ्या

नवी दिल्ली : UGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जारी करण्यात आल्या आहेत. यावेळी डिसेंबर 2020 आणि जून 2021 सेशनची परीक्षा एकाचवेळी आयोजित केली जाईल. परीक्षेचे आयोजन 6 ऑक्टोबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत केले जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जारी नोटीसनुसार परीक्षेसाठी (UGC NET 2021 Exam) विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करता आले नव्हते ते 5 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. सर्व इच्छुक उमेदवारांसाठी या तारखेपर्यंत विंडो खुली राहील. अ‍ॅप्लीकेशन फी जमा करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2021 आहे. तर, अ‍ॅप्लीकेशनमध्ये करेक्शन करण्यासाठी 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत विंडो खुली राहील.

UGC NET 2021 Registration : या स्टेप्सने करा रजिस्ट्रेशन

1: ऑफिशियल वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.

2: नंतर वेबसाइटवर दिलेल्या Application Form च्या लिंकवर क्लिक करा.

3: आता New Registration च्या लिंकवर क्लिक करा.

4: यानंतर आपले नाव, वडिलांचे नाव, मोबाइल, ईमेल आणि इतर माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.

5: आता लॉग इन करून अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरा, फोटो आणि साईन अपलोड करा.

6: यानंतर अ‍ॅप्लीकेशन फी जमा करा.

7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अ‍ॅप्लीकेशनची प्रिंट घ्या.

हे आहे अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरी कँडिडेट्सला 1000 रुपये आणि राखीव गट जसे की ओबीसी, EWS मध्ये येणार्‍या उमेदवारांसाठी 500 रुपये द्यावे लागतील. याशिवाय एससी, एसटी आणि ट्रान्सजेंडर कॅटेगरीच्या उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.

काय आहे UGC NET Exam?

देशभरातील युनिव्हर्सिटी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्यूनियर प्रोफेसर फेलोशिप आणि सहायक प्रोफेसरची पात्रता मिळवण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमीशन (UGC) नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NAT) चे आयोजन करते. ही परीक्षा वर्षात दोनवेळा, सामान्यपणे जून आणि डिसेंबरमध्ये होते. पॅटर्ननुसार यामध्ये दोन पेपर असतात. ज्यामध्ये 150 बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न गुणांचा असतो आणि परीक्षेची एकुण वेळ तीन तास असते. परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते.

हे देखील वाचा

Ajit Pawar | …तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पीएम मोदींना मराठीत पत्र


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ugc net 2021 exam application window reopens here how to register

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update