अॅड. उज्वल निकम यांना महर्षी पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणांनो विमनस्क होऊ नका आणि वृत्तवाहिन्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी तरुणांपुढे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा सद्यस्थितीत त्याची गरज आहे असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्वल निकम यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवात महर्षी पुरस्कार स्वीकारताना केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fdb47214-d2a8-11e8-8a10-5b899396b73b’]

पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा महर्षी पुरस्कार ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ पद्मश्री उज्वल निकम यांना फिनोलेक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक रितु छाब्रिया यांच्या हस्ते आज(बुधवारी) प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, श्री महालक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ.जयश्री बागुल यांच्या हस्ते सौ.ज्योती निकम यांना सौभाग्यलेणे, पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ वास्तू विशारद महेश नामपूरकर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, डॉ.विनोद शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिनेते सयाजी शिंदे यांना शाल, पुष्पगुच्छ, श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी प्रास्तविक केले. पुणे नवरात्रौ महोत्सवाने सातत्य राखून महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला असे त्यांनी यावेळी सांगितले.

[amazon_link asins=’B06Y5HD2T7,B019XSHJWG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’355c7dce-d2a9-11e8-af71-c5768a8526e9′]

मानवाची नैसर्गिक उपजत बुद्धी सध्याच्या वृत्तवाहिन्यांच्या मालिकांमध्ये हरवत चालली आहे, याविषयी अॅड.निकम यांनी खंत व्यक्त केली आणि स्त्रियांनी आपली कुटुंब व्यवस्था आपली संस्कृती जपण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

सध्या चालू असलेल्या मी टू चळवळीचा ओझरता उल्लेख करुन ते म्हणाले, हॉलीवूड मधून सध्या बॉलीवूड मध्ये सध्या जे आलेले आहे ते एका वावटळीसारखे आहे. अनेकांची प्रतिष्ठा यात आहे. हा विषयच एकूण संवेदनशील असल्याने इत्ता यावर मी फार बोलणार नाही असे अॅड.निकम म्हणाले.
[amazon_link asins=’B01D2IBM5S,B078HYJSS3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26a9ad16-d2a9-11e8-8981-c71afd65a924′]

आबा बागुल यांचा वकील म्हणून मी आता त्यांच्या मागे राहीन, ते चांगले काम करीत आहेत तोपर्यंत मी त्यांची बाजू लढविन असे सांगून त्यांनी या महोत्सवाच्या नियोजनाबद्दल प्रशंसा केली.

नका मज मोठे म्हणा कोणी
मात्र सदैव ऋणात ठेवा. अशा काही स्वरचित काव्यपंक्ती अॅड.निकम यांनी सादर केल्या.

सामाजिक कामासाठी सर्व संस्थांनी एकत्र यावे आणि समाजातील आरोग्य, स्वच्छता हे उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन रितु छाब्रिया यांनी केले.

पर्यावरण रक्षणासाठी झाडे जगवा. गडावर पेटत्या मशाली नेण्यापेक्षा तिथे जाऊन एक एक झाड लावा आणि हिरव्या झाडांच्या मशाली तयार करा शिवाजी महाराजांना त्यात आनंद होईल अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

वैष्णवी गिरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला नवदुर्गा आदिशक्ती हा विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. ऋतुजा पुरकर यांनी सूत्रसंचालन केले. घनश्याम सावंत यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

[amazon_link asins=’B07C54FBG2,B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f752d8d-d2a9-11e8-91de-1b2d5065394b’]