Ulhasnagar Corporation | शिवसेना महिला सभापतींना चक्क धमकीचे पत्र, उल्हासनगर महापालिकेत प्रचंड खळबळ

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर (Ulhasnagar Corporation) येथील शिवसेनेच्या (Shiv Sena) महिला सभापतींना धमकीचे पत्र आल्याने उल्हासनगर महापालिका (Ulhasnagar Corporation) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षण समिती सभापती शुभांगी बेहनवाल (Education Committee Chairman Shubhangi Behanwal) यांना थेट त्यांच्या दालनात धमकीचे पत्र आले आहे. मुख्यतः म्हणजे धमकीचे पत्र कोणी दिले हे अजून समोर आले नाही.

शुभांगी बेहनवाल या 4 महिन्यापूर्वी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी म्हणून निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. शिक्षण समितीच सभापतिपद आल्यानंतर बेहनवाल यांनी महापालिका शाळांची झालेली दुरवस्था आणि विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यास प्रारंभ केला. परंतु, हे करत असताना शिक्षण मंडळात मागील 4 वर्षात पालिका शाळांच्या दुरुस्तीसाठी आणि सोयी-सुविधांसाठी किती खर्च करण्यात आले, याची माहिती त्यांनी शिक्षण मंडळाकडून पत्राच्या माध्यमातून मागवली होती. यावरून मागील एक महिन्यापासून ही माहिती देण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शुक्रवारी (6 ऑगस्ट) रोजी शुभांगी बेहनवाल (Education Committee Chairman Shubhangi Behanwal) या आपल्या दालनामध्ये आल्यानंतर त्यांच्या टेबलवर “जास्त चौकशी करू नका, नाहीतर तुमचा पण मनोज शेलार करावा लागेल” असं लिखित पत्र त्यांच्या टेबलरवर ठेवण्यात आले होते. ते त्यांना समजताच पालिका मुख्यालयात चर्चेला उधाण आलं होतं. या प्रकारानंतर पालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर सीसीटीव्हीमध्ये तपासाचे काम सुरु आहे.

या दरम्यान, गतवर्षी याबाबत शिक्षण मंडळाची माहिती माहिती महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार (Manoj Shelar) यांनी मागवली होती.
तेव्हा शेलार यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला (Attack) केला गेला होता.
त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते. या हल्ल्या प्रकरणी पालिकेतील एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती.
तसेच, आजच्या प्रकरणामध्ये पात्रात शेलारचे नाव नमूद केल्याने शिक्षण विभागात काहीतरी गौडबंगाल होत असल्याची चर्चा सुरु आहे.
मात्र, धमकी देणाऱ्याला लवकर शोधून काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल,
असे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी (Rajendra Chaudhary), गटनेता धनंजय बोढारे यांनी इशारा दिला.
तसेच, यांच्यासह सभापती शुभांगी बेहनवाल यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात (Central Police Stations) याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Web Title :- Ulhasnagar Corporation | dont inquire too much threatening letter to shiv sena women chairpersons in ullhasnagar municipal corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

Murder in Jalna | दारुसाठी धान्य विकणाऱ्या मुलाला आईनं रोखलं, मद्यपी मुलाने केला निर्घृण खून

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी