ULIP मधून केलेल्या कमाईवर लागणार Tax, सर्क्युलर जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ULIP-Tax | जास्त प्रीमियम असलेल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (Unit Linked Insurance Plans : ULIPs) मधून मिळणार्‍या कमाईवर आता कर आकारला जाईल. सोमवारी (24 जानेवारी 2022) या विषयाशी संबंधित एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. प्राप्तीकर विभागातील (Income Tax) सूत्रांच्या हवाल्याने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, सरकारने युलिपवर कोणताही कर लावलेला नाही. या परिपत्रकाद्वारे, गेल्या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात (युलिपशी संबंधित) केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (ULIP-Tax)

 

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 18 जानेवारी रोजी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असलेल्या ULIP च्या संदर्भात भांडवली नफा मोजण्याच्या पद्धतींबाबत नियम अधिसूचित केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कर आकारणीच्या विविध पैलूंची माहिती देणारे परिपत्रक जारी करण्यात आले.

 

प्राप्तीकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ विशिष्ट प्रकरणांमध्येच ULIP च्या रोखीकरणासाठी भांडवली नफ्याच्या गणनेची पद्धत स्पष्ट करते. ULIP मधून मिळणारी रक्कम करपात्र बनवण्यामागचा उद्देश म्युच्युअल फंडांच्या बरोबरीने करणे हा आहे, असेही निदर्शनास आणून देण्यात आले. (ULIP-Tax)

आयटी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने एजन्सीला सांगितले की, प्राप्तीकर कायद्याच्या कलम 10 (10D) मध्ये 2021 च्या वित्त कायद्याद्वारे सुधारणा करण्यात आली. या अंतर्गत, 1 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या ULIP अंतर्गत प्राप्त झालेल्या रकमेला सूट दिली जाणार नाही. ज्यामध्ये, कोणत्याही वर्षासाठी देय वार्षिक प्रीमियम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदार विम्यापेक्षा गुंतवणुकीच्या उद्देशाने युलिपला अधिक पसंती देत असल्याचे आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
म्युच्युअल फंडाच्या बाबतीत रिडेम्पशनवर कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो.
मात्र, युलिपच्या बाबतीत असे नव्हते. तसेच, प्रीमियमचा विमा भाग खूपच कमी होता आणि प्रीमियमचा गुंतवणूकीचा भाग जास्त होता.

 

दरम्यान, आणखी एका अधिकार्‍याने सांगितले की, फायनान्स अ‍ॅक्ट 2021 (Finance Act 2021) मधील या दुरुस्तीमुळे म्युच्युअल फंड युनिट्स आणि यूलिप दोन्ही कराच्या दृष्टीने समान आहेत याची खात्री केली आहे.

 

Web Title :- ULIP-Tax | now unit linked insurance plans taxable to create level playing field with mf

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा