उमदी पोलिस ठाणेच्या हाकेच्या अंतरावर घरफोडी

जत : पोलीसनामा ऑनलाईन

उमदी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सना मोबाईल शॉपीच्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी दुकानातील २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. चोरटे पत्रा कापत असताना पोलिसांना समजले नसल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे.

याबाबत दुकान मालक यासीन सिकंदर सय्यद यांनी फिर्य़ाद दिली असून उमदी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उमदी येथे बसस्थानकाच्या मागे असलेल्या सना मोबाईल शॉपीच्या छताचा पत्रा कापून  चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील विविध कंपनीचे दोन लाख १८ हजार रुपयांचे महागडे ५९ मोबाइल चोरून नेले आहेत. सय्यद यांनी आज (सोमवार) सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहीती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. या चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याचा संशय आहे. गजबजलेल्या चौकात आणि ते ही पोलिस ठाणे लगत चोरी झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

[amazon_link asins=’B079458414′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d204d5c-788e-11e8-a90d-f54402ea631b’]

हाकेच्या अंतरावरील दूसरी चोरी

उमदी पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या निवासस्थानापासून फक्त शंभर मीटर अंतरावर असलेली मोबाईल दूकान फोडल्याने गस्ती पथकाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍न चिन्ह निर्माण होत आहे. गेल्या वर्षी देखील  बस स्थानक परिसरातील दहा दुकाने फोडण्यात आले होते. त्या चोरीचा उलघडा करण्यास उमदी पोलिसांना अद्याप यश आले नाही.