भारत २०२७ मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार : संयुक्त राष्ट्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०२७ पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालात देण्यात आली आहे. भारताच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत २७. ३ कोटींची वाढ होऊ शकते.

‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट २०१९ हायलाईट्स’मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनने अहवाल दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, आगामी ३० वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल. २०५० पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती ७. ७ अब्जांवरुन ९. ७ अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे ११ अब्जांपर्यंत पोहोचू शकते.

सध्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसऱ्या क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १. २१ अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या १. ३८ अब्ज आहे.

२०५० पर्यंत लोकसंख्येत जी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा