Budget 2019 : आर्थिक सर्वेक्षणाच्या ‘या’ ५ आकड्यांवरून जाणून घ्या देशाची ‘परिस्थिती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प सादर होण्याआधी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला असून यात देशाचा विकास आणि त्यावर काय करता येईल यावर विचार मांडण्यात आले आहेत. या अहवालातील समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय मुद्रा भांडारात मागील वर्षीपेक्षा कमी विदेशी मुद्रा असून आयात मूल्यामध्ये देखील कमी दिसून आलेली आहे. त्याचबरोबर या अहवालात ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत यावर देखील सल्ला देण्यात आला आहे.
या ५ मुद्द्यांच्या आधारे आपली अर्थव्यवस्था सध्या कुठे आहे हे पाहुयात.

१)जीडीपीमध्ये वाढ
या अहवालात जीडीपीच्या वाढीचा देखील उल्लेख करण्यात आला असून २०१९-२०२० या वर्षात ७% जीडीपी राखण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याआधी २०१८-२०१९ मध्ये जीडीपी ६.८% सांगण्यात आले होते.

२)आयात-निर्यात
निर्यातीच्या दृष्टीने २०१८-२०१९ हे वर्ष अतिशय चांगले राहिले आहे. या वर्षात निर्यातीत १२.५ % वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर या सगळ्यात भारताची आयात देखील वाढली आहे. यामध्ये देखील १५.५% वाढ झालेली दिसून येत आहे.

३) भरपूर परदेशी चलन
या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सध्या पर्याप्त प्रमाणात विदेशी मुद्रा असून यामध्ये कोणत्याही प्रमाणात कमी आलेली नाही. २०१८-१९ या वर्षात भारताकडे ४१२.९ बिलियन डॉलर विदेशी मुद्रा असून २०१७-१८ मध्ये हि ४२४ बिलियन डॉलर इतकी होती.

४)धान्य उत्पादन
अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या वर्षात देशात २८३.४ मिलियन टन धान्याचे उत्पादन होण्याचे अनुमान आहेतर २०१७-१८ मध्ये हेच उत्पादन २८३.४ मिलियन टन इतकेच होते.

५) राजकोषीय घट
या मध्ये मात्र भारतासाठी चांगली खबर असून यामध्ये २०१८-१९ या वर्षात भारताची राजकोषीय घट GDP च्या ३.४ टक्क्यावर गेली असून २०१७-१८ मध्ये ती ३.५ टक्के होती.

केवळ सर्दी -पडश्यावरच नाही तर ‘या’ आजारांवरही आहे ‘गवती चहा’ गुणकारी

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश गिळंकृत :’ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात आरोप

प्रवाशांसाठी खुशखबर ! शिवनेरीचा प्रवास आता झाला स्वस्त