Union Cabinet Expansion | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2 ते 3 दिवसात, अनेकांना मिळणार ‘डच्चू’; नव्या चेहऱ्यांना संधी, महाराष्ट्रातून ‘ही’ दोन नावं निश्चित?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील हालचालींना आता वेग आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळामधून (Cabinet) कोणाला डच्चू मिळणार, कोणाचं खातं बदललं जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्रामध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची (Union Cabinet Expansion ) चर्चा सुरु झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळचा विस्तार (Union Cabinet Expansion) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (party president J.P. Nadda) यांच्यामध्ये मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

Aadhaar Card मध्ये पत्ता अपडेट करण्याची ही सुविधा UIDAI ने केली बंद, भाडेकरूंची समस्या वाढली; जाणून घ्या

महाराष्ट्रातून हे दोन नेते
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांनी चांगली कामगिरी केलेली नाही,
त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे.
तर अनेक नव्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) वर्णी लागणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) नारायण राणे (Narayan Rane) आणि हिना गावित (Hina Gavit) यांची नावे सध्या चर्चेत आहे.
यापूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याही नावाची चर्चा होती.
याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), सर्वानंद सोनवाल (Sarvanand Sonwal), त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat), अनुप्रिया पटेल (Anupriya Patel), सुशील मोदी (Sushil Modi), रिटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi),
जफर इस्लाम (Zafar Islam) आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) सत्यदेव पचौरी (Satyadeva Pachauri) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Team India ला मॅचच्या पूर्वी ‘या’ कोचने दिला ‘सेक्स’ करण्याचा सल्ला, केला आश्यर्चकारक खुलासा’

नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.
निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
नारायण राणे हे महाराष्ट्रातील मराठा समाजातील (Maratha community) मोठा चेहरा आहे.
याशिवाय मुंबई महापालिका निवडणुका (Mumbai Municipal Election) जवळ आल्या आहेत.
नारायण राणे यांनी बाराच काळ शिवसेनेत (Shivsena) घालवला आहे.
तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री (CM) देखील होते. त्यामुळे मुंबई महापालिकेतील बरेच खाच-खळगे राणे यांना माहिती आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना मंत्रीपद देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) केला जाऊ शकतो.

Web Titel : Union Cabinet Expansion union cabinet expansion in the next two to three days