राजनाथ सिंह यांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; नाशिकला मिळणार दिलासा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील फक्त आर्मी राखीव रुग्णालयात विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होतील, असे सांगितले आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक वैद्यकीय सोयी-सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. लोकांना जिवंत असताना प्राणवायू आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत. तर जीव गमावल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. ही परिस्थिती बिकट होत आहे. त्यानंतर आता राजनाथसिंह यांनी लखनौ, पटना, अहमदाबाद, नाशिक यासह देशातील काही शहरात हे रुग्णालये आहेत. या रुग्णालयातून नागरिकांवर उपचार केले जाणार आहेत. याबाबत राजनाथसिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरी यांना आदेश दिले आहेत.

दरम्यान, DRDO आणि HAL यांच्या कॅम्पसमध्ये ही कोविड रुग्णालये उभारणीचे काम जलदगतीने सुरू झाले आहे. देशातील आर्मीच्या 63 रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत DRDO आधारावर 63 रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्डची उभारणी केली जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.