Covishield, Covaxin, Sputnik-V लसीचे दर केंद्राकडून निश्चित; खासगी रुग्णालयांच्या मनमानी वसूलीला ‘लगाम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम   देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत आहे. या काळात लसीकरण मोहिमही वेगाने सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केली होती. ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल त्यांनी खासगी रुग्णालयात (private hospital) पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात असे म्हटले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जाणा-या कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत. म्हणजेच खासगी रुग्णालये यापुढे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारू शकणार नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे.
यात खासगी रुग्णालयात (private hospital) कोविशिल्ड या लसीचा प्रति डोस 780 रुपयांना मिळणार आहे.
यात 600 रूपये लसीची किंमत + 5 टक्के जीएसटी आणि 150 रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे.
तर कोवॅक्सिन ही लस 1410 तर स्पुटनिक व्ही लस 1145 रूपये प्रति डोस दराने दिले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तसेच लसीचा दर निश्चित करण्यासोबतच शासन त्यावर दररोज लक्ष ठेवणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रावर कडक कारवाई करण्यात येणार येईल.
खासगी रुग्णालये सेवा शुल्कासाठी 150 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारणार नाहीत यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांवर सोपवली आहे.
आरोग्य विभागाने लसीचे कमाल दर निश्चित करत याबाबतीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मेमोरँडम पाठवल आहे.

अवघ्या काही मिनिटात कळेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, जाणून घ्या सोपी पध्दत

Web Title : union health ministry caps charges administration corona vaccine covishield covaxin sputnik private hospital