Union Home Ministers Medal – 2021 | सर्वोत्कृष्ट तपासाबाबत अ‍ॅन्टी करप्शन नाशिकचे अधीक्षक सुनील कडासने यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ठ अन्वेषण पदक-2021’ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Union Home Ministers Medal – 2021 | उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातील 152 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष पदक (Union Home Ministers Medal – 2021) जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात 4 महिला अधिकारी आहेत. सुनिल कडासने (Sunil Kadasane) यांनी श्रीरामपूर येथे अपर पोलीस अधिक्षक (Additional Superintendent of Police) असताना केलेल्या दुहेरी खूनाच्या तपासासाठी हे पदक देण्यात आले आहे.

सुनिल कडासने हे 2011 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक असताना शिर्डी येथील पाटणी व गोंदकर हत्याकांड घडले होते. शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्याचा कौशल्यपुर्वक तपास करुन आरोपींविरोधात नाशिक विशेष सत्र न्यायालयात (MCOCA) आरोपपत्र दाखल केले. या खटल्यातील 17 सराईत गुन्हेगार व कुख्यात पाप्या शेख याला न्यायालयाने दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपी पाप्या शेख व इतरांना दोषी ठरवून जन्मठेपेची व एकूण 1 कोटी 38 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
यासाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी कडासने यांना पुरस्कार व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित केले होते.
आता या गुन्ह्याचा कौशल्यपुर्वक तपास केल्याची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे.
कडासने यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर झालं आहे.

Web Title :- Union Home Ministers Medal – 2021 | Sunil Kadasane, Superintendent of Anti-Corruption Nashik, has been awarded ‘Union Home Minister’s Outstanding Investigation Medal-2021’ for the best investigation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Court | गर्भांत व्यंग्य असलेल्या महिलांना मिळाली गर्भपातास परवानगी; उच्च न्यायालयाचे आदेश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केली कायदेशीर मदत

Royal Enfield चे CEO विनोद दसारी यांनी दिला राजीनामा, बी. गोविंदराजन बनले नवीन एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर

Pune Crime | अपहरण प्रकरणात टोळीप्रमुखाचा मोक्का न्यायालयाने जामीन फेटाळला