Union Minister Nitin Gadkari | ‘एक-एक किलो सावजी मटण घरापर्य़ंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हरलो…’, नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. निवडणुकीत जे देतायत ते घ्या, पण मत तुम्हाला आवडेल त्याच उमेदवाराला द्या, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. आता नितीन गडकरी यांनी आणखी एका व्यक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. निवडणुकीत एक-एक किलो मटन वाटल्यानंतरही पराभवाला समोरं जावं लागलं होतं, असा किस्सा नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सांगितला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे (Maharashtra Rajya Shikshak Parishad, Nagpur) एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) बोलत होते. निवडणुकीत पोस्टर लावून किंवा लोकांना खायला-प्यायला घालून निवडणूक (Election) जिंकता येते, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मी निवडणूक लढवली आहे. शक्य तेवढे सर्व प्रयोग करुन पाहिले आहेत, एका निवडणुकीत मी एक वेगळा प्रयोग केला. लोकांच्या घरी एक-एक किलो सावजी मटण पोहोचवलं. पण त्यानंतरही त्या निवडणुकीत माझा पराभव झाला, असा किस्सा गडकरींनी सांगितला.

नितीन गडकरी म्हणाले, लोक अत्यंत हुशार आहेत. ते म्हणतात, जेत देत आहेत ते ठेवून घ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची गरज लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नसते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.

नितीन गडकरी म्हणाले, लोक म्हणतात सर MP चे तिकीट द्या. नाही तर MLA चे तरी तिकीट द्या.
नाही तर MLC तरी बनवा. हे नसेल तर आयोग तरी द्या. यापैकी काहीच नाही, तर मेडिकल कॉलेज द्या.
मेडिकल कॉलेज नाही तर, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा D.Ed Bed कॉलेज तरी द्या.
हेही शक्य नसेल, तर प्रायमरी स्कूल तरी द्या. म्हणजे यातून काय होईल, शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही आर्धा पगार
आम्ही आणि गावोगावी रोजगार हमी. यातून देशाची प्रगती होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav | पुणे जिल्ह्यात 8736 सार्वजनिक गणेश मंडळे ! उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार; अर्ज करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन