पेशवेकालीन चतुश्रृंगी माता मंदिराचा आगळावेगळा इतिहास 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील चतुश्रृंगी माता मंदिर प्राचीन काळातील एक अद्भुत आणि प्राचीन मंदिर आहे. चतुश्रृंगी मातेवर भक्तांची अपार श्रद्धा आहे. या मंदिराची  आख्यायिका अशी आहे की देवीच्या दर्शनाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते. नवरात्रीत भाविकांची विशेष गर्दी असते. चतुश्रृंगी मातेचे  दर्शन करण्यासाठी दूरवरून भाविक येतात.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15c7f8eb-d117-11e8-8d5d-f132c26e7496′]
चतुश्रृंगीचे आद्य ठाणे सप्तश्रृंगी मंदिर आहे. सप्तश्रृंगी माता मंदिर नाशिक पासून ६० किमी अंतरावर असणाऱ्या  कालवन  तालुक्यातील  नांदुरी गावात स्थित आहे. पुराणातील कथेनुसार सप्तश्रृंगी मातेचा एक खूप मोठा भक्त होता. तो दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंगी मंदिरात जायचा. परंतु वय वाढल्यानंतर त्याला देवीचे दर्शन करायला जाणे अशक्य झाले. त्या भक्ताला आपण देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही या गोष्टीचे  खूपच दुःख झाले. त्यावर देवीने भक्ताच्या स्वप्नात येऊन दृष्टांत  दिला की तू चिंता करू नकोस,  तू माझ्या दर्शनाला सप्तश्रृंगी मंदिरात येऊ शकत नाही म्हणून काय झालं मी स्वतःच तुला दर्शन देण्यासाठी येईल.
जेव्हा भक्ताला जाग आल्यानंतर त्याच्या दृष्टीस चतुश्रृंगी मातेची सर्वांग सुंदरमूर्ती पडली. ज्या डोंगरावर ही मूर्ती मिळाली त्याच जागेवर या भक्ताने चतुश्रृंगी मातेचं मंदिर बनवलं.
[amazon_link asins=’B07HGBFSC7,B014CLL3KS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21c176f0-d117-11e8-91b6-c19fc5c0d537′]
नवरात्रौउत्सवात चतुश्रृंगी माता मंदिरात भाविकांची खूपच गर्दी असते. १८० पायऱ्या चढून भक्त चतुश्रृंगीमातेच्या दर्शनासाठी येतात. ह्या मंदिराची विशेषतः  अशी आहे की काही लोक अनेक पिढ्यांपासून देवीची सेवा करत आहे.  ह्या मंदिरात लाडू प्रसाद विक्री करणारे , वाद्य वाजवणारे तसेच चोपदार यांच्या अनेक पिढ्या देवीच्या सेवेत कार्यरथ आहेत .