ह्रदयाच्या अनियमित ठोक्यांचं कारण बनू शकतं उच्च रक्तदाब, जगभरात 4 कोटींहून अधिकजण प्रभावित

लंडन : वृत्तसंस्था – मानवी जीवन जगत असताना अनेकांना आजार, दुखण्याचा सामना करावा लागतो. त्यामध्ये रक्तदाब (Blood Pressure) ही एक मोठी समस्या असते. काही लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो तर काहींना लो ब्लड प्रेशरचा.

उच्च रक्तदाब या त्रासाच्या पार्श्वभूमीवर एक नवा अभ्यास केला जात आहे. त्यामध्ये हाय ब्लड प्रेशर ह्रदयाच्या अनियमित ठोक्याचे कारण बनू शकते. युरोपीय जर्नल ऑफ प्रीव्हेंटिव्ह कार्डियोलॉजीमध्ये अध्ययनचा अंदाज प्रसिद्ध करण्यात आला होता. ब्रिटनच्या किंग कॉलेज लंडन आणि ग्रीसच्या कपोडिस्टिरयन युनिव्हर्सिटी ऑफ एथेन्सच्या अभ्यासकांनी हा अभ्यास केला.

हाय ब्लड प्रेशरबाबत किंग कॉलेज लंडनच्या अभ्यासक डॉ. जॉजियोस जॉर्जियोपोलस यांनी सांगितले, की हे सिद्ध होते, की वाढत्या ब्लड प्रेशरमुळे ह्रदयाच्या अनियमित ठोक्याची समस्या होऊ शकते. बीपीला नियंत्रित केल्यास या समस्यापासून वाचता येऊ शकते.

पाच पटीने जास्त असतो स्ट्रोकचा धोका
ह्रदयाच्या अनियमित ठोक्याचे सर्वात सामान्य प्रकार असतो तो म्हणजे एट्रियल फायब्रिलेशन (अनियमित ह्रदयाचे ठोके). यामुळे जगभरातील चार कोटींपेक्षा जास्त लोक ग्रस्त आहेत. अशा लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका पाच पटीने जास्त असतो. अनियमित ह्रदयाच्या ठोक्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.

दहा लाखांपेक्षा जास्त डेटावर अभ्यास
ब्लड प्रेशर आणि एट्रियल फायब्रिलेशनवरून दहा लाखांपेक्षा जास्त लोकांच्या डेटावर अभ्यास केला. यामध्ये अभ्यासकांनी ब्लड प्रेशरचा संबंध एट्रियल फायब्रिलेशनपासून असल्याचे सांगितले.