Coronavirus : ब्रिटनमध्ये हाहाकार ! भारताच्या ‘डबल म्युटेंट’ कोरोना व्हेरियंटचे 77 प्रकरणं आले समोर

लंडन : वृत्तसंस्था –   ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे संताप निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये भारतात सापडलेल्या कोरोनाच्या ”डबल म्युटेंट” प्रकारातील 77 प्रकरणे समोर आली आहेत. ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसच्या अधिक संक्रमक भारतीय प्रकार B.1.617 च्या 77 प्रकरणांची ओळख झाली आहे, जे covid-19 रोगाचे कारण सांगतात. हा पहिल्यांदा भारतात सापडला होता आणि ब्रिटनमध्ये याला ”व्हॅरियंट अंडर इन्वेस्टीगेशन” हे नाव देण्यात आले होते. पब्लिक हेल्थ इंग्लंड, जे ब्रिटनमध्ये व्हॅरियंट ऑफ कन्सर्न आणि VUI च्या नवीन प्रकरणाच्या संख्येची साप्ताहिक अपडेट जाहीर करते, त्यांनी गुरुवारी सांगितले की भारतात पहिल्यांदा समोर आलेल्या प्रकारामध्ये अनेक म्युटेशनचा समावेश आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या साप्ताहिक रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की PHF द्वारे एका नवीन प्रकाराला ”व्हॅरियंट अंडर इन्वेस्टीगेशन” हे नाव देण्यात आले आहे. भारतामध्ये पहिल्यांदा समोर आलेल्या E484Q, L452R आणि P681R यासह अनेक म्युटेशनचा समावेश आहे. PHI ने ब्रिटनमध्ये या प्रकारच्या 77 प्रकरणाची ओळख केली आहे. या व्हॅरियंटचे VUI-21APR-01 असे नामकरण करण्यात आले आहे. PHI आणि आंतरराष्ट्रीय भागीदार या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

काय आहे भारतात सापडलेला डबल म्युटेंट कोरोना व्हॅरियंट?

भारतात सापडलेला डबल म्युटेंट कोरोना व्हॅरियंट ज्यांना B.1.617 स्ट्रेन असेही म्हणतात, या म्युटेशनमुळे हा प्रकार वेगाने पसरण्याची शक्यता आहे आणि आंशिक स्वरूपाच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे वाचु शकतो. असे मानले जाते की हा प्रकार COVID-19 महामारीच्या भारतात असलेल्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार आहे. ज्यामध्ये संक्रमण होण्याचा दर आणि रुग्णालयात जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.

या प्रकारचा कोरोना वेगात पसरत आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. त्याच वेळी हे शरीरातील प्रतिकारक शक्तीपासून वाचण्यास सक्षम आहे. हा नवीन डबल म्युटेंट कोरोना व्हॅरियंट शरीराच्या प्रतिकारक शक्तींना वाचवून शरीरात संक्रमणाचा स्थर वाढवत आहे.

म्युटेशन आणि व्हॅरियंट यामध्ये फरक

जेव्हा व्हायरस रूप बदलते तेव्हा तो पूर्ण राहत नाही, त्याचे काही ना काही घटक राहून जातात आणि यालाच आपण म्युटेशन असे म्हणतो. जेव्हा त्या म्युटेशनचा मनुष्यावर परिणाम होतो तेव्हा त्याला व्हॅरियंट असे म्हंटले जाते.