तब्बल १५० प्राध्यापिकांना बलात्काराची धमकी देणारा गजाआड, ‘पार्सल’ने गुंता सुटला

जयपुर : वृत्तसंस्था – राजस्थान युनिव्हर्सिटीच्या सर्व महिला प्रोफेसर आणि लेक्चरर एक अनोळखी फोनमुळे परेशान झाल्या होत्या. फोनवरून सतत त्यांना बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. अश्लील बोललं जात होतं. या प्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजस्थान विद्यापिठातील महिला प्रोफेसर्सना एक व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून वैताग देत होता. फोन करून अश्लीलही बोलायचा आणि बलात्काराची धमकीही द्यायचा. या गोष्टीला वैतागून महिला प्रोफेसर्सने विद्यापिठात येणंच बंद केलं होतं. ६५ महिलांनी या फोनबाबत तक्रार केली होती. तर प्राचार्यांनी हा आकडा १५० महिला असल्याचं सांगितलं होतं.

‘हा’ होता आरोपी
पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी हिसारमधील एका विद्यापिठातील प्रोफेसरचा मुलगा असून तो अल्पवयीन आहे. आरोपी हिसारमधील विद्यापिठातील वायफायचा वापर करत कॉल करून राजस्थान विद्यापिठातील महिला प्रोफेसरसोबत अश्लील बोलत असे. त्यांना धमकावत असे. पोलिसही हे सगळं पाहून चकित झाले. कारण इंटरनेट कॉल अमेरिकमधून असल्याचं दाखवत होतं. त्यामुळे पोलिसांना आरोपीला पकडणं अवघड जात होतं. आरोपीच्या एका चुकीमुळे तो पकडला गेला.

‘असा’ पकडला आरोपी
आरोपीने जयपूरमधील एका महिला प्रोफेसरला पार्सल पाठवलं होतं. हे पार्सल हैद्राबादमधून बुक करण्यात आलं होतं. जेव्हा पोलिस हैद्राबादमधील कंपनीत पोहोचले तेव्हा समजलं की, हे बुकींग हिसार विद्यापिठातील वायफायने करण्यात आले आहे. पार्सल या अल्पवयीन मुलापर्यंत पोहोचण्याआधीच जयपूर पोलीस आरोपी पर्यंत पोहोचली आणि त्याला अटक केली.

या प्रकरणी महिला प्रोफेसर्सचं म्हणणं आहे की, सकाळ असो वा रात्र असो कधीही फोन येत होता आणि अश्लील बोललं जात होतं. नकार दिल्यास वेडंवाकडं करण्याची धमकीही दिली जायची. कॅश ऑन डिलिव्हरीने गिफ्ट पाठवण्यासोबतच बलात्काराची धमकी दिली जात होती.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

You might also like